नाशिक

डीआरडीओ रॉकेटचा प्रशिक्षणादरम्यान मोठा आवाज

दिंडोरी ः प्रतिनिधी
दिंडोरी तालुक्यातील जानोरी, जऊळके दिंडोरी, शिवनाई, वरवंडी तसेच आंबेदिंडोरी या चार गावांच्या जमिनीच्या हद्दीत असलेल्या आंबेहिल या ठिकाणी प्रत्येक वेळी ए.सी.ई.एम. नाशिक येथे स्थिर रॉकेट मोटर प्रशिक्षण करत असतात. आजूबाजूच्या गावांना किंवा ग्रामपंचायतींना घटनेच्या दोन दिवस अगोदर पत्रक दिले जाते; परंतु यावेळेस जानोरी ग्रामपंचायतीला कोणतेही पत्र किंवा फोनद्वारे माहिती न देता शुक्रवारी (दि. 12) रात्री आठ वाजेच्या दरम्यान भारत सरकार रक्षा मंत्रालय रक्षा अनुसंधान एव संघटन ऊर्जा पदार्थ उन्नत केंद्र यांनी ए.सी.ई.एम. रॉकेट मोटर प्रशिक्षण केल्याने जानोरी परिसरात मोठा आवाज झाल्याने जानोरी ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण
झाले होते.

ग्रामपंचायतीला व आसपासच्या ग्रामस्थांना व शेतकर्‍यांना कळवले जाते. परंतु, या वेळेस ग्रामपंचायतीला कोणतेही पत्र न देता तसेच आसपासच्या शेतकर्‍यांना व ग्रामस्थांना न कळवता मोटर प्रशिक्षण केल्याने जानोरी परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते.
-सुभाष नेहेरे, सरपंच, जानोरी

भारत सरकार मंत्रालय रक्षा अनुसंधान विकास संघटन पदार्थ आंबेहिल (डीआरडीओ)मध्ये जानोरी गावातील शेतकर्‍यांची सर्वांत जास्त जमीन गेली असतानाही जानोरी गावातील शेतकर्‍यांना ‘डीआरडीओ’चा कोणताही फायदा झालेला नाही, तसेच ‘डीआरडीओ’मध्ये कोणतेही मोटर प्रशिक्षण होत असताना जानोरी ग्रामपंचायतीला किंवा आसपासच्या शेतकर्‍यांना कळवले पाहिजे. परंतु, काल डीआरडीओने मोटर प्रशिक्षण केले. त्यावेळेस जानोरी गावातील शेतकरी तसेच ग्रामस्थांना कोणतीही माहिती न देता मोटर प्रशिक्षण केल्याने जानोरी परिसरात मोठ्या आवाजाने व जाळ दिसल्याने ग्रामस्थ भयभीत झाले होते. त्यामुळे डीआरडीओ जानोरी ग्रामपंचायतीला किंवा शेतकर्‍यांना कोणत्याही प्रकारचे सहकार्य करत नाही. – हर्षल काठे, उपसरपंच

याबाबत ए.सी.ई.एम. नाशिक येथे स्थिर रॉकेट मोटर परीक्षण शुक्रवारी (दि. 12) दुपारी करण्यात येईल. या परीक्षणाचा कालावधी हा 70 सेकंदांचा राहील. या परीक्षणाच्या कालावधीदरम्यान ध्वनी स्तर 180 डी.बी. राहील. या परीक्षणाच्या कालावधीदरम्यान नागरिकांना घाबरण्याची गरज नाही, असे डीआरडीओने पत्राद्वारे जऊळके ग्रामपंचायतीला कळविले होते. परंतु, प्रशिक्षणाची वेळ दुपारी असताना ते सायंकाळी झाल्याने नागरिकांत संभ्रम निर्माण झाला.

 

Editorial Team

Recent Posts

अर्ध्यावरचा डाव

- अ‍ॅड. प्रतीक्षा चौधरी पावसाळ्याची सकाळ होती. सगळीकडे चिंब असं वातावरण झालेलं होतं. आज आमच्या…

20 hours ago

प्रेम म्हणजे आयुष्य… की आयुष्याचा एक भाग

- अमोल जगताप नाशिकमध्ये नुकतीच घडलेली एक हृदयद्रावक घटना संपूर्ण समाजाला अंतर्मुख करून गेली. प्रेमसंबंधातून…

20 hours ago

‘जेन झी’ला आधी समजून घ्या!

- प्रा. योगेश हांडगे आजच्या घरात, महाविद्यालयात, कार्यालयात किंवा समाजात एक पिढी सतत चर्चेत आहे-जेन…

20 hours ago

तांबटी तलावाला दीड कोटीतून नवसंजीवनी

आमदार डॉ. राहुल आहेरांंच्या पाठपुराव्याला यश; लोकार्पण, जलपूजन चांदवड : वार्ताहर तालुक्यातील वडबारे येथील तांबटी…

20 hours ago

पेपरफुटीमुक्त परीक्षा : विधेयकापासून विश्वासार्ह व्यवस्थेकडे

परीक्षा म्हणजे केवळ गुणांची स्पर्धा नसते; ती विद्यार्थ्यांच्या मेहनतीची, प्रामाणिकतेची आणि भविष्यातील संधींची खरी कसोटी…

20 hours ago

तांत्रिक चूक

फेसबुक आणि इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सची कंपनी असलेल्या मेटा कंपनीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या…

20 hours ago