नाशिक : प्रतिनिधी
यंदा मान्सून लांबण्याची शक्यता असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. जून महिना अर्धा संपला तरी अद्याप पेरण्या होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे शेतकर्यांवर चिंतेचे ढग दाटले आहेत. एकीकडे मान्सून लांबणीवर पडलेला असताना, दुसरीकडे नाशिक जिल्ह्यात गेल्या सात महिन्यांत सात शेतकर्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.
नाशिक जिल्हा कृषिप्रधान आणि शेतीसाठी समृद्ध जिल्हा मानण्यात येतो. मात्र, असे असतानाही जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या होत आहेत. त्यामुळे शेतकरी आत्महत्येचे भीषण वास्तव समोर आले आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यात गेल्या वर्षी मुबलक पाऊस झाला होता. जिल्ह्यातील शेतीची परिस्थितीही चांगली आहे. मात्र, सातत्याने वातावरणात बदल होत असल्याने अस्मानी संकटाचा शेतकर्यांना सामना करावा लागत आहे. अवकाळी पाऊस, गारपीट, वादळ-वारा यांसारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. अशा परिस्थितीत सततच्या अडचणीला कंटाळून शेतकर्यांनी आत्महत्येला कवटाळल्याचे दुर्दैवी चित्र जिल्ह्यात समोर आले आहे.
जिल्ह्यात जानेवारी ते मे 2026 या कालावधीत सात शेतकर्यांनी आत्महत्या केल्या आहेत. सर्वाधिक चार शेतकरी आत्महत्या बागलाण तालुक्यात झाल्याची नोंद आहे. कळवण तालुक्यात दोन शेतकर्यांनी, देवळा तालुक्यात एका शेतकर्याने आत्महत्या केली आहे. दरम्यान, सात शेतकर्यांनी आत्महत्या केली असली, तरी प्रशासकीय पातळीवर आत्महत्या प्रकरणाच्या पडताळणीनंतर सातपैकी पाच आत्महत्या या शेतकरी आत्महत्या असल्याच्या निकषास पात्र असून, त्यांच्या कुटुंबीयांंना शासनाकडून मदत देण्यात आली. मात्र, यातील एक आत्महत्या प्रकरण अपात्र ठरले असून, एक अद्याप चौकशीत आहे.
शासनाकडून लाखाचे अर्थसहाय्य
आत्महत्याग्रस्त शेतकर्यांच्या कुटुंंबांना शासनाकडून आत्महत्येचे प्रकरण मंजूर झाल्यानंतर एक लाखाचे आर्थिक सहाय्य देण्यात येते. एक लाख रुपये संबंधित तहसील कार्यालयामार्फत आत्महत्याग्रस्त शेतकर्यांच्या कुटुंबीयांना वितरित करण्यात येतात. एक लाखापैकी पोस्टातील खात्यावर 70 हजार रुपये मुदत ठेव (एफडी) स्वरूपात, तर 30 हजार रुपये रोख वितरित केले जातात.
Seven farmers commit suicide in the district in seven months.
न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…
मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…
डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…
वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…
नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…
महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…