कुटुंबास मारण्याची धमकी देऊन विवाहितेवर तब्बल दोन वर्षे लैंगिक अत्याचार
नाशिक: प्रतिनिधी
सव्वीस वर्षीय विवाहितेवर संशयिताने लैंगिक अत्याचार करुन कुटुंबास ठार करण्याची धमकी दिली. याबाबत २६ वर्षीय महिलेने आडगाव पाेलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आमाेद सुभाष बुद्धीसागर (वय ४०, रा. पत्त्याचा उल्लेख नाही) असे संशयिताचे नाव आहे. त्याचा शाेध पाेलीसांनी सुरु केला आहे. पीडितेच्या फिर्यादीनुसार ती, आडगाव पाेलीसांच्या हद्दीतील नांदूर नाका भागात राहते. तिचा काही वर्षांपूर्वी विवाह झाला असून दाेन वर्षांपूर्वी पीडितेचा पती तिला साेडून गेला. ती दाेन अपत्यांसह राहत असतांना काही महिन्यांपूर्वी तिची ओळख संशयित बुद्धीसागर याच्याशी झाली. त्यानंतर १ ऑगस्ट २०२२ ते २० एप्रिल २०२४ या कालावधीत दाेघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले. वरील कालावधीत दाेघे साेबत राहत असतांना बुध्दीसागर याने पीडितेवर नांदूरनाका व त्रिमूर्ती चाैक भागातील घरांत लैंगिक व अनैसर्गिक अत्याचार केले. दरम्यान, काही दिवसांपासून पीडितेने बुद्धीसागर याच्यासाेबत राहण्यास नकार दिला. त्यामुळे दाेघांत खटके उडाले. त्यानंतर पीडितेने आडगाव पाेलीस ठाणे गाठून ‘कुठे या प्रकाराची वाच्यता केलीस तर तुझ्या कुटुंबास जीवे ठार मारेन’ अशी धमकी दिली, अशी फिर्याद नाेंदविली.
—
पावसाळ्यात केस जास्त गळतात का? डॅन्डरफ जास्त होतो का? पावसाळ्यात केस जास्त गळतात आणि डॅन्ड्रफदेखील…
वरण-सुरणाची आमटी, भात -भगर, भाजी-भोपळा, पोळी-राजगिर्याचे फुलके, चटणी-नारळाची, चिंचेची, खजुराची, सुरणाची, कोशिंबीर -काकडीची, लोणचे- लिंबाचे…
भारतीय संस्कृतीत स्त्री ही कायमच एक आधारस्तंभ मानली गेली आहे. आई, बहीण, पत्नी, सून, मुलगी…
पळसेत बिबट्याचे भरदिवसा शेतकऱ्यांना दर्शन नाशिकरोड : प्रतिनिधी नाशिकरोड शहरापासून अगदी हकेच्या अंतरावर असणाऱ्या पळसे…
शाच्या आर्थिक प्रगतीत कृषी क्षेत्राचा वाटा मोठा आहे. शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. कृषी…
मनपाकडून कार्यवाही; पाडकामाला महिना लागणार नाशिक : प्रतिनिधी रविवार कारंजा येथे 1968 मध्ये उभारलेल्या यशवंत…