नाशिक

नाशिकची जागा भाजपाने लढवावी दिनकर पाटील यांची पक्षानेतृत्वाकडे मागणी

नाशिकची जागा भाजपाने लढवावी

दिनकर पाटील यांची पक्षानेतृत्वाकडे मागणी

भाजपाकडून पुन्हा नाशिकच्या जागेवर दावा
नाशिक : प्रतिनिधी

राजकीय परिस्थिती भाजपासाठी  अनुकुल असून चारशे पार जाण्यासाठी भाजपानेच नाशिकची जागा लढवायला हवी अशी मागणी   भाजपचे प्रदेश निमंत्रित सदस्य दिनकर पाटील यांनी भाजपाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांच्याकडे केली आहे.
राज्याचे अन्न व नागरी पुरठामंत्री छगन भुजबळ यांनी  नाशिक लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले असले तरी अद्याप नाशिकच्या जागेचा तिढा सुटू शकला नाही तर   या जागेवर महायुतीतील भाजपा, शिवसेना शिंदे गट , राष्ट्रवादी कॉग्रेस अजित पवार गट  आग्रही आहेत. त्यामुळे नाशिक लोकसभेच्या जागेचा तिढा सुटायचे चिन्ह दिसत नाही. त्यातच आता भाजपाने पुन्हा  नाशिकच्या  जागेवर दावा केला आहे.
दिनकर पाटील यांनी  प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे मतदानाला अवघे काही  दिवस बाकी असताना अजूनही महायुतीच्या उमेदवाराबाबत संभ्रमावस्था कायम आहे. युतीकडील घटक पक्षांचे दावे पतिदावे यात हा मतदारसंघ अडकल्यामुळे  महाविकास आघाडीच्या उमेदवाराने प्रचारात आघाडी घेतली आहे.  मंत्री छगन भुजबळ यांनी कमी असलेल्या वेळेचा आणि एकूणच राजकीय , सामाजिक परिस्थितीचा विचार करीत माघार घेणे पसंत केलेआहे. भुजबळांच्या माघारीमुळे नाराज असलेल्या ओबीसी बांधवाना संघटित करणे हेही कमी काळातील मोठे आव्हान असणार आहे. पण सध्याची राजकीय परिस्थिती ही इतर कोणत्याही पक्षापेक्षा भाजपाला जास्त अनुकूल आहे. मागील दहा वर्षापासून भाजपाचे असलेले तीन आमदार, महानगरपालिेकतील सत्ता ,त्र्यंबकेश्‍वर नगरपालिेकतील सत्ता, पक्षाचे मतदारसंघाच्या अगदी शेवटच्या टोकापर्यंत असलेले संघटन, भाजपाला मानणारा मोठ्या प्रमाणात असलेला वर्ग आणि सोबतच पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांचे सर्वमान्य नेतृत्व , या सर्व गोष्टीचा विचार करून भाजप कोअर कमिटीचे सदस्य, सर्व मंडल अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, आमदार, नगरसेवक, सर्व पदाधिकारी यांनी पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वाला  महायुतीत नाशिकची जागा भाजपाला सोडण्याची मागणी केली आहे. कोणत्याही अवास्तव गोष्टींचा विचार न करता अत्यंत अभ्यासपूर्वक आणि पक्षाकडून झालेल्या अनेक सर्वेक्षणांच्या आधारे नाशिक लोकसभेत भाजपाला यश मिळेल अस दावा केला जात आहे. त्यामुळे भाजपानेच नाशिकची जागा लढवावी अशी आग्रही मागणी पाटील यांच्याकडून करण्यात आली आहे.

भागवत उदावन्त Admin

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

मोहाडीत मोहाडमल्ल महाराजांची शतकाची रोठ परंपरा

लोकसहभागातून साडेतीन लाखांचा रथ; आज भव्य मिरवणूक दिंडोरी : प्रतिनिधी तालुक्यातील मोहाडी येथील ग्रामदैवत श्री…

19 hours ago

सिंहस्थाच्या नावाने त्र्यंबकेश्वरचे रस्ते गाळात

ओव्हर स्मार्ट नियोजनामुळे नागरिक अन् भाविक हैराण त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळा 2027 च्या पार्श्वभूमीवर…

19 hours ago

पावसा पावसा… तू पण!

नाशिक शहर आणि सभोवतालच्या परिसरात मागील महिन्याभरात धो..धो.. पाऊस बरसला आहे. नाशिक जिल्ह्यात जुलै महिन्यात…

19 hours ago

अब्दुल्लांचे आंदोलन

कॉक्रोच जनता पार्टीच्या ‘चलो संसद’ आंदोलनात 20 जुलै रोजी प्रचंड हंगामा झाला. विद्यार्थ्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी…

19 hours ago

जीवघेणे खड्डे !

पाच जणांचा मृत्यू; नागरिकांमध्ये प्रचंड संताप नाशिक : प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पाश्वर्र्भूमीवर शहरात हजारो कोटी…

19 hours ago

खड्डेमुक्तीसाठी मंत्री महाजनांचा सात दिवसांचा अल्टिमेटम

अन्यथा अधिकार्‍यांवर कारवाई, ठेकेदारही रडारवर नाशिक : प्रतिनिधी वर्षभरात सिंहस्थ कुंभमेळा होत असल्याने शहरात रस्ते…

20 hours ago