नाशिक : प्रतिनिधी
आयुष्यात प्रत्येक जण वेगवेगळ्या टप्प्यावर साथ सोडून जातो. पण एक अशी गोष्ट जी आपली साथ कधीच सोडत नाही. ती गोष्ट म्हणजे सावली. पण आता सावलीही आपली साथ सोडणार आहे. हो आश्चर्य वाटले पण हे खरे आहे. आता सावलीही आपली साथ सोडणार आहे. नाशिकमध्ये 19 मे रोजी नाशिकमध्ये शून्य सावली दिवस अनुभवता येणार आहे.
सूर्याचा उत्तरायण आणि दक्षिणायन असा भासमान मार्ग पृथ्वीच्या 23.50 अक्षांश दक्षिण आणि उत्तरेकडे असतो. म्हणजेच कर्कवृत्त आणि मकरवृत्त या दरम्यान असणार्या सर्व भूभागावर सूर्य वर्षांतून दोनदा दुपारी डोक्यावर येतो आणि दोनदा शून्य सावली दिवस येतात. सूर्य आणि पृथ्वी यातील कोनीय व्यास आणि अंशात्मक अंतर जिथे जुळते, तिथे शून्य सावली दिवस घडतो. उत्तरायण होताना एकदा आणि दक्षिणायन होताना एकदा तसेच सूर्य दररोज 0.50 अंश सरकतो. म्हणजे तो एकाच अक्षवृत्तावर दोन दिवस राहतो. त्यामुळे एकाच ठिकाणावरून दोन दिवस शून्य सावली अनुभवता येते. नाशिक जिल्ह्यात 19 मे रोजी शून्य सावली दिवस आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील सावंतवाडी येथे 3 मे, धुळे जिल्ह्यात 31 मे, दि. 3 मे – सावंतवाडी, शिरोडा, मांगेली, खूषगेवाडी, 4 मे – मालवण, आंबोली, 5 मे – देवगड, राधानगरी, रायचूर, 6 मे – कोल्हापूर, इचलकरंजी, 7 मे – रत्नागिरी, सांगली, मिरज, 8 मे – कर्हाड, जयगड, अफजलपूर, 9 मे – चिपळूण, अक्कलकोट, 10 मे – सातारा, पंढरपूर, सोलापूर, 11 मे – महाबळेश्वर, फलटण, तुळजापूर, वाई, 12 मे – बारामती, बार्शी, उस्मानाबाद, 13 मे – पुणे, मुळशी, दौड, लातूर, लवासा, असरल्ली, 14 मे – लोणावळा, अलिबाग, दाभाडे,पिंपरी-चिंचवड, देहू, जामखेड, आंबेजोगाई, 15 मे -मुंबई, नवी मुंबई, कर्जत, बीड, माथेरान, राळेगण सिद्धी, सिरोंचा, 16 मे – बोरिवली, ठाणे, डोंबिवली, कल्याण, भिवंडी, बदलापूर, नारायण गाव, खोडद, अहमदनगर, परभणी, नांदेड, 17 मे – नालासोपारा, विरार, आसनगाव, अहेरी, आल्लापल्ली, 18 मे – पालघर, कसारा, संगमनेर, अंबाड, हिंगोली, मूलचेरा, 19 मे – औरंगाबाद, डहाणू, कोपरगाव, वैजापूर, जालना, पुसद, बल्लारशा, चामोर्शी, 20 मे – चंद्रपूर, मेहकर, वाशीम, वणी, मूल, 21 मे – मनमाड, चिखली, गडचिरोली, सिंदेवाही, रोहना, 22 मे – मालेगाव, चाळीसगाव, बुलढाणा, खोपोली, यवतमाळ, आरमोरी, 23 मे – खामगाव, अकोला, देसाईगंज, ब्रम्हपुरी, नागभीड, 24 मे – धुळे, जामनेर, शेगाव, वर्धा, उमरेड, दर्यापूर, 25 मे – जळगाव, भुसावळ, अमरावती, अंमळनेर, तेल्हारा, 26 मे – नागपूर, भंडारा, परतवाडा, चोपडा, 27 मे – नंदुरबार, शिरपुर, बुर्हाणपूर, चिखलदरा, तुमसर, गोंदिया, सावनेर, काटोल, रामटेक, 28 मे – अक्कलकुआ, शहादा, पांढुरणा, वरुड, नरखेड, 29 मे – बोराड, नर्मदा नगर, 30 मे – धाडगाव, 31 मे – तोरणमाळ यानुसार जिल्हे बदलत शून्य सावली दिवस अनुभवता येणार आहे.
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…
नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्या…