मोदी यांचा आत्मविश्वास ढासळला ; शरद पवार यांचा दावा, नाशकात पत्रकार परिषद

मोदी यांचा आत्मविश्वास ढासळला

शरद पवार यांचा दावा, नाशकात पत्रकार परिषद
नाशिक: प्रतिनिधी
आपण प्रचाराच्या निमित्ताने सर्वत्र फिरलो, लोक बदल घडवण्याच्या मानसिकतेत आहेत, त्यामुळेच मोदी यांचा आत्मविश्वास ढासळला आहे. महाविकास आघाडीला सकारात्मक वातावरण आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार म्हणाले. नाशिक दौऱ्यावर असलेल्या शरद पवार यांनी आज सकाळी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक मुद्यावर भाष्य केले. मोदी यांना सभेत कांद्यावर बोला असे म्हनायला लावणे चुकीचे काही नाही. कांद्याचे भाव पडत असेल तर शेतकरी रोष करतीलच, ज्या युवकाने मोदींच्या सभेत कांद्यावर बोला अशी घोषणा दिली त्याचा आपल्याला अभिमान आहे, असे शरद पवार म्हणाले.
राज ठाकरे यांच्यावर ही त्यांनी बोलताना राज ठाकरे म्हणतात नाशिक त्यांचा बालेकिल्ला आहे पण नाशिकला हल्ली ते जास्त दिसत नाही. प्रफुल्ल पटेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घातलेल्या जिरेटोप बद्दल शरद पवार म्हणाले, लाचारी किती करावी याला पण काही मर्यादा असतात, असा टोला त्यांनी प्रफुल्ल पटेल यांना लगावला.
पंतप्रधान मोदी यांना आपण एकदा इस्रायल ला घेऊन गेलो होतो, तेथील शेतीची सर्व माहिती, तसेच तंत्रज्ञान याबद्दल त्यांनी माहिती जाणून घेतली होती, असे असताना आज मोदी जे काही बोलत आहे त्यात राजकारण आहे, असेही शरद पवार म्हणाले. यावेळी राष्ट्रवादी चे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्यासंख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *