नाशिक

मेंढरं चारणारी पोरं झाली फौजदार

जुळ्या हंडाळ बंधूंची संघर्षातून घडलेली प्रेरणादायी यशोगाथा

लासलगाव : समीर पठाण
परिस्थितीशी दोन हात करणारेच इतिहास घडवतात! दारिद्य्र, अन्यायाची चटके आणि भटकंतीला न जुमानता जिद्द, कष्ट आणि शिक्षणाच्या बळावर पोलीस उपनिरीक्षक पदापर्यंत मजल मारणारे जुळे बंधू चांगदेव बबन हंडाळ आणि आप्पासाहेब बबन हंडाळ हे आज राज्यातील लाखो युवकांसाठी प्रेरणास्थान ठरले आहेत.
मूळचे राहुरी तालुक्यातील वावरथ येथील हंडाळ कुटुंबाचे जीवन मुळा धरणामुळे विस्कळीत झाले. जमीन पाण्याखाली गेल्यानंतर कुटुंबाने पारंपरिक मेंढपाळ व्यवसाय स्वीकारला. हलाखीच्या परिस्थितीमुळे मोठ्या दोन भावांनी स्वतःचे शिक्षण सोडून मजुरी केली आणि धाकट्या जुळ्या भावांना शिकवले. अंगावर कपडे व पायात चप्पल नसताना खताच्या गोणीची पिशवी घेऊन हे दोघे रोज तब्बल 22 किमी प्रवास करत शाळेत जात.
जमिनीच्या वादात कुटुंबाला झालेला त्रास आणि एका प्रसंगी “काय करायचे ते कर, फौजदार आमच्या ओळखीचा आहे” हे ऐकलेले शब्द त्यांच्या मनाला चटका लावून गेले. याच अन्यायाविरोधात वडिलांचे “माझी दोन्ही पोरं फौजदार झाली पाहिजे” हे वाक्य त्यांच्या आयुष्याचा प्रेरणामंत्र बनले.स्पर्धा परीक्षेसाठी शहरात जाण्याची आर्थिक क्षमता नसल्याने त्यांनी गावातच उपलब्ध पुस्तकांतून अभ्यास केला. जंगलात स्वतः धावपट्टी तयार करून, लाल मातीचा लांब उडीचा खड्डा बनवून आणि झाडाच्या फांद्यांवर पुल-अप्स मारून त्यांनी शारीरिक चाचणीचा सराव केला. अखेर त्यांच्या अथक मेहनतीचे चीज झाले.
2016 मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून दोघांची पोलीस खात्यात निवड झाली. त्यानंतर विभागीय परीक्षेद्वारे दोघेही पोलीस उपनिरीक्षक झाले. यात आप्पासाहेब हंडाळ यांनी राज्यात 22 वा क्रमांक मिळवत यश संपादन केले. यशाची बातमी समजताच “आई-बापाचं पांग फिटलं!” असे म्हणत दोन्ही भावांनी एकमेकांना मिठी मारली.

आप्पासाहेब श्रीरामपूरला, तर चांगदेव पारनेरला

सध्या आप्पासाहेब हंडाळ हे अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात, तर चांगदेव हंडाळ हे पारनेर पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक म्हणून सेवा बजावत आहेत. विशेष म्हणजे, 7 ऑगस्ट रोजी या जुळ्या बंधूंचा वाढदिवस होता. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवलेले हे यश स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्‍या प्रत्येक तरुणासाठी अत्यंत प्रेरणादायी आहे.

 

Shepherd boys became police sub-inspectors.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

1 day ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

1 day ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

1 day ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

1 day ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

1 day ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

1 day ago