शिवार गजबजले दुभत्या जनावरांनी
निफाड ः आनंदा जाधव
उन्हाची तीव्रता वाढत असतानाच नदी नाले कोरडेशुष्क होत असून जनावरांच्या चार्याचा प्रश्न गंभीर बनल्याने चांदवड, मालेगाव नांदगाव, सिन्नर येवला तालुक्यातील मेढपाळांनी निफाडच्या गोदाकाठ भागात डेरा टाकला आहे.
यावर्षी मार्चपासूनच सूर्य आग ओकत असल्याने एप्रिलच्या मध्यावर तापमानाचा पारा चाळीशी पार गेला आहे. झाडांची पानगळ झाल्याने सावली गायब झाली आहे. जिल्ह्याचे अनेक तालुक्यात ओला संपुष्टात आला असतानाच वाळलेला चारा देखील मिळणे दुरापास्त झाले आहे. नदी नाले कोरडेठाक पडल्याने जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनल्याने दुभती जनावरे सांभाळणे अवघड बनले आहे. साहजिकच शेळ्या, मेंढ्या, गाई, म्हशी घेऊन मेंढपाळ निफाडच्या गोदाकाठ भागात दाखल झाले आहेत.
तालुक्यात सध्या उन्हाळ कांदा काढण्याचे काम अंतिम टप्प्यात आल्याने शिवार मोकळा झाल्याने या कांद्याचे शेतात हे मेंढपाळ मुक्कामी थांबत आहेत. नदी- नाले याच्याकडेला दिवसभर जनावरे चारायची किंवा कांद्याची पात शेळ्यामेढ्यांना चारा म्हणून द्यायची अन् या शेळ्या मेंढ्यांचे निघणारे दूध जवळच्या डेअरीवर घालायचे, असा या मेंढपाळांचा दिनक्रम. त्यामुळे कुटुंबासह डेरेदाखल झालेले हे पशुपालक गोदाकाठच्या शिवारात जागोजागी थांबल्याचे दिसत आहेत. निफाडच्या विशेषता शिवरे. खानगाव थडी, नांदुरमध्यमेश्वर, करंजगाव, म्हाळसाकोरे, कोठुरे, दिंडोरी, काथरगाव, सायखेडा, चांदोरी, चितेगाव, गोंडेगाव, तामसवाडी, तारुखेडले, रसलपूर, निफाड, जळगाव, या गावांच्या शिवारात हे पशुपालक, मेंढपाळ वास्तव्यास असल्याचे दिसत आहे.जोपर्यंत पाऊस पडत नाही तोपर्यंत हे मेंढपाळ दरवर्षी याच परिसरात राहतात. चरताना या शेळ्या मेंढ्या यांचे खत शेतात पडते म्हणून शेतकरी या मेंढपाळाना त्यांचे शेतात काही दिवस थांबण्याचा आग्रह करतात.त्याबदल्यात या मेंढपाळ यांना धान्य किंवा ठराविक रक्कम देखील दिली जाते. जनावरांनी जास्त दूध द्यावे यासाठी त्यांना पुरक आहार दिला जातो. सध्या चार्यासाठी ऊस, मका, कांदा, भाजीपाला आदी पिकांचे क्षेत्र मोकळे होत असल्याने या शेतात ही जनावरे चरताना दिसत आहेत. सध्या निफाड, सिन्नर आणि दिंडोरी तालुक्याचा काही भाग अश्या ठिकाणी मालेगाव, नांदगाव, येवला, चांदवडचा पूर्व भाग या परिसरातून पशुपालक मोठ्या प्रमाणात कुटुंबासह दाखल झाले असून याच परिसरात बिबट्याचां वावर देखील मोठ्या प्रमाणात असल्याने अनेकवेळा या कुटुंबांना रात्र जागून कुटुंबासह जनावरांचे रक्षण करावे लागत आहे. एकूणच सध्या निफाडचा शिवार या दुभत्या जनावरांनी गजबला असल्याचे दिसत आहे.
सिडको : दिलीपराज सोनार अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कामटवाडे परिसरात असलेल्या अमरधाम रोड नजीक एका…
पंचवटी : वार्ताहर म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शंकर पार्क, बालकृष्णनगर, कंसारा माता चौक आणि शांतीनगर,…
जयपूर : एकाच कुटुंबातील 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ओव्हरटेकच्या नादात ट्रेलर आणि कारची समोरासमोर…
सिडको ः विशेष प्रतिनिधी उंटवाडी येथील नंदिनी नदीच्या तीरावर असलेल्या आणि गर्द हिरव्या महाकाय वटवृक्षाच्या…
सिन्नर : प्रतिनिधी जागतिक वसुंधरा दिनानिमित्त 22 एप्रिल ते 1 मे महाराष्ट्र दिन या कालावधीत…
सिन्नर : प्रतिनिधी स्वत:ला ज्वलनशील पदार्थाने पेटवून घेत पत्नी आणि सासूला मिठी मारून त्यांना जीवे…