नाशिक

चारा पाण्याचे शोधार्थ मेढपाळांचा गोदाकाठला डेरा

शिवार गजबजले दुभत्या जनावरांनी

निफाड ः आनंदा जाधव
उन्हाची तीव्रता वाढत असतानाच नदी नाले कोरडेशुष्क होत असून जनावरांच्या चार्‍याचा प्रश्न गंभीर बनल्याने चांदवड, मालेगाव नांदगाव, सिन्नर येवला तालुक्यातील मेढपाळांनी निफाडच्या गोदाकाठ भागात डेरा टाकला आहे.
यावर्षी मार्चपासूनच सूर्य आग ओकत असल्याने एप्रिलच्या मध्यावर तापमानाचा पारा चाळीशी पार गेला आहे. झाडांची पानगळ झाल्याने सावली गायब झाली आहे. जिल्ह्याचे अनेक तालुक्यात ओला संपुष्टात आला असतानाच वाळलेला चारा देखील मिळणे दुरापास्त झाले आहे. नदी नाले कोरडेठाक पडल्याने जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनल्याने दुभती जनावरे सांभाळणे अवघड बनले आहे. साहजिकच शेळ्या, मेंढ्या, गाई, म्हशी घेऊन मेंढपाळ निफाडच्या गोदाकाठ भागात दाखल झाले आहेत.
तालुक्यात सध्या उन्हाळ कांदा काढण्याचे काम अंतिम टप्प्यात आल्याने शिवार मोकळा झाल्याने या कांद्याचे शेतात हे मेंढपाळ मुक्कामी थांबत आहेत. नदी- नाले याच्याकडेला दिवसभर जनावरे चारायची किंवा कांद्याची पात शेळ्यामेढ्यांना चारा म्हणून द्यायची अन् या शेळ्या मेंढ्यांचे निघणारे दूध जवळच्या डेअरीवर घालायचे, असा या मेंढपाळांचा दिनक्रम. त्यामुळे कुटुंबासह डेरेदाखल झालेले हे पशुपालक गोदाकाठच्या शिवारात जागोजागी थांबल्याचे दिसत आहेत. निफाडच्या विशेषता शिवरे. खानगाव थडी, नांदुरमध्यमेश्वर, करंजगाव, म्हाळसाकोरे, कोठुरे, दिंडोरी, काथरगाव, सायखेडा, चांदोरी, चितेगाव, गोंडेगाव, तामसवाडी, तारुखेडले, रसलपूर, निफाड, जळगाव, या गावांच्या शिवारात हे पशुपालक, मेंढपाळ वास्तव्यास असल्याचे दिसत आहे.जोपर्यंत पाऊस पडत नाही तोपर्यंत हे मेंढपाळ दरवर्षी याच परिसरात राहतात. चरताना या शेळ्या मेंढ्या यांचे खत शेतात पडते म्हणून शेतकरी या मेंढपाळाना त्यांचे शेतात काही दिवस थांबण्याचा आग्रह करतात.त्याबदल्यात या मेंढपाळ यांना धान्य किंवा ठराविक रक्कम देखील दिली जाते. जनावरांनी जास्त दूध द्यावे यासाठी त्यांना पुरक आहार दिला जातो. सध्या चार्‍यासाठी ऊस, मका, कांदा, भाजीपाला आदी पिकांचे क्षेत्र मोकळे होत असल्याने या शेतात ही जनावरे चरताना दिसत आहेत. सध्या निफाड, सिन्नर आणि दिंडोरी तालुक्याचा काही भाग अश्या ठिकाणी मालेगाव, नांदगाव, येवला, चांदवडचा पूर्व भाग या परिसरातून पशुपालक मोठ्या प्रमाणात कुटुंबासह दाखल झाले असून याच परिसरात बिबट्याचां वावर देखील मोठ्या प्रमाणात असल्याने अनेकवेळा या कुटुंबांना रात्र जागून कुटुंबासह जनावरांचे रक्षण करावे लागत आहे. एकूणच सध्या निफाडचा शिवार या दुभत्या जनावरांनी गजबला असल्याचे दिसत आहे.

Editorial Team

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

4 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

4 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

5 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

5 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

5 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

5 hours ago