मुंबई: संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल अखेर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज जाहीर केला, सुप्रीम कोर्टाने 10 जानेवारी पर्यंत निकाल देण्याचे फर्मान सोडल्यानंतर अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मॅरेथॉन सुनावणी घेतली होती, एकनाथ शिंदे यांचा गट हीच खरी शिवसेना असल्याचा निकाल नार्वेकर यांनी दिला,
राज्यात निर्माण झालेल्या सत्ता संघर्ष लढाई सुप्रीम कोर्टानंतर विधानसभा अध्यक्ष यांच्या दालनात पोचली, आमदार अपात्र करण्याचा अधिकार हा विधानसभा अध्यक्ष यांचा असल्याचे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट करत विधानसभा अध्यक्ष यावर निर्णय घेतील, असा निकाल धनंजय चंद्रचूड यांच्या घटनापीठाणे दिला होता, भरत गोगावले यांचा व्हीप कायदेशीर असल्याचे सांगत शिंदे गटाचे आमदार पात्र ठरवले