नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या त्रिवेणी तुंगार विजयी
त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी
नगरपालिका निवडणुकीत भाजपाचा बालेकिल्ला असलेेल्या त्र्यंबकनगरीत शिवसेना शिंदे गटाने मुसंडी मारली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने (अ.प. गट ) सर्वाधिक नगरसेवक मिळवत आपली पकड मजबूत केली आहे. महायुतीच्या घटक पक्षांनी परस्परांच्या विरुद्ध निवडणूक लढवली. आगामी सिंहस्थ कुंभमेळा लक्षात घेत नगराध्यक्षपदाची निवडणूक प्रतिष्ठेची झाली होती. भाजपाच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना शिंदे गटाच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या प्रचारसभांनी निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
नगराध्यक्षपद
त्रिवेणी तुंगार, शिवसेना शिंदे गट- 4728, विजयी
कैलास घुले, भारतीय जनता पार्टी- 3860, पराभूत
एकूण मतदान :
प्रभाग 1 -अ) पूजा खाटीकडे, अपक्ष (राष्ट्रवादी अ.प. पुरस्कृत) मते 467, अनिता बागूल (भाजपा) मते 440, ब) मंजू रवींद्र वारुनसे- बिनविरोध (राष्ट्रवादी अ.प.), प्रभाग 2- अ) विष्णू दोबाडे (भाजपा) मते 758, संजय झोले (काँग्रेस) मते 425. ब) संध्या देवरे (भाजपा) मते 761, सोनाली कदम, शिवसेना (शिंदे गट) मते 454. प्रभाग 3- अ) लहांगे कल्पना (राष्ट्रवादी अ.प.) मते 382, वाटणे मंगला (भाजपा) मते 218. ब) कडलग अमोल (राष्ट्रवादी अ.प.) मते 406, काळे केशव, भाजपा, मते 172. प्रभाग 4 – अ) ललिता झोले (भाजपा) मते 419, लिलके वनिता (राष्ट्रवादी अ.प.) मते 268. ब) चोथे कैलास (भाजपा) मते 632, गमे शंकर (राष्ट्रवादी अ.प.) मते 393. प्रभाग 5 – अ) जाधव रंगनाथ (राष्ट्रवादी अ.प.) मते 625, फसाळे तुकाराम (भाजपा) मते 354. ब) शिरसाठ पल्लवी (राष्ट्रवादी अ.प.) मते 739, बागडे वैशाली (भाजपा) मते 253. प्रभाग 6- अ) कोरडे लीला (शिवसेना शिंदे गट) मते 744, झोंबाड भारती गोपाळ, भाजपा, मते 425. ब) गायधनी प्रशांत (शिवसेना शिंदे गट) मते 764, कमलेश जोशी, भाजपा, मते 408. प्रभाग 7 -अ) उगले कुणाल (अपक्ष, शिवसेना शिंदे गट पुरस्कृत) मते 565, कदम कमलेश (भाजपा), मते 557. ब) कदम रत्नप्रभा (शिवसेना शिंदे गट) मते 559, लोहगावकर श्रद्धा (भाजपा) मते 551. प्रभाग 8 -अ) पाटील सूरज (भाजपा) मते 635, मुर्तडक विजय (शिवसेना शिंदे गट) मते 567. ब) पाटणकर वेदिका (शिवसेना शिंदे गट) मते 838, वाडेकर वैष्णवी (भाजपा) मते 384. प्रभाग 9- अ) भांगरे अक्षय (भाजपा) मते 596, नीलेश गांगोडे (शिवसेना शिंदे गट) मते 424. ब) लोखंडे आरती रघुनाथ (आडके) शिवसेना शिंदे गट, मते 555, गंगापुत्र सुवर्णा (भाजपा) मते 484. प्रभाग 10 – अ) उजे जयश्री (राष्ट्रवादी अ.प.) मते 537, अश्विनी घागरे (भाजपा) मते 319. ब) रामायणे नितीन (राष्ट्रवादी अ.प.) मते 475, अजय अडसरे (भाजपा), मते 414.
भाजपाला एकहाती सत्ता मिळेल, असे वातवरण निर्माण झाले होते. मात्र, प्रत्यक्षात निकालाने सर्वांचा भ्रमनिरास झाला आहे. नगराध्यक्षपदावर शिवसेना शिंदे गटाच्या त्रिवेणी तुंगार यांनी भाजपचे कैलास घुले यांचा 868 मतांनी पराभव केला आहे. येथे कैलास घुले हे कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय आहेत. एका अर्थाने त्र्यंबकनगरीने कुंभमेळामंत्री महाजन यांना नाकारले असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्रिवेणी तुंगार या मागील पंचवार्षिकला भाजपाच्या बिनविरोध नगरसेविका होत्या.
सन 2018 पासून त्यांनी नोव्हेंबर 2025 पर्यंत सातत्याने भाजपाचे उपक्रम राबविले. नगराध्यक्षपदासाठी भाजपाकडे त्यांची प्रबळ दावेदारी मानली जात होती. मात्र, वेळेवर त्यांना नाकारलेली उमेदवारी शिवसेना शिंदे गटाने लक्षात घेतली आणि त्रिवेणी तुंगार यांना बळ दिले. दुसरीकडे राष्ट्रवादी अ.प. पक्षाने केलेली कमाई भरघोस अशी आहे.
विद्यमान आमदार हिरामण खोसकर, ज्येष्ठ नेते संपतराव सकाळे यांनी येथे तळ ठोकून रणनीती आखली होती. नगराध्यक्षपदासाठी शहराध्यक्ष सुरेश गंगापुत्र यांनी स्वत:ची उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे राष्ट्रवादी अ. प. पक्षाने प्रारंभी शिवसेना शिंदे गटाबरोबर युती करण्याचा घेतलेला निर्णय पुढे टिकला नाही. प्रत्यक्ष निवडणुकीत सुरेश गंगापुत्र यांनी प्रचारात सहभाग घेतला नाही. अखेर राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बहिरू मुळाणे, जिल्हाध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुणे यांनी प्रभागातील उमेदवारांवर लक्ष केंद्रित केले.
यावेळी नगराध्यक्ष आणि 6 नगरसेवक शिवसेना शिंदे गटाने मिळवले आहेत. राष्ट्रवादी अ.प. गटाने 8 नगरसेवक तर भाजपाने 6 नगरसेवकांच्या जागा मिळवल्या. महाविकास आघाडीच्या काँग्रेस पक्षाने नगराध्यक्षपदाची जागा व दोन नगरसेवकांची जागा लढवली, मात्र त्यांचा विशेष प्रभाव दिसून आला नाही. राष्ट्रवादी (श.प.) आणि शिवसेना (उबाठा) यांनी एकही जागा लढवली नाही.
प्रभाग क्रमांक 7 मध्ये अधिकृत घोषणा झाली तेव्हा अ जागेसाठी विजयी उमेदवार कुणाल उगले (अपक्ष) व (शिवसेना शिंदे गट पुरस्कृत) मतदान 565 मते, तर पराभूत उमेदवार कल्पेश राजेंद्र कदम, भाजपा, मतदान 557, फरक 8 मते होता. तर ब जागेसाठी विजयी उमेदवार रत्नप्रभा संजय कदम, शिवसेना (शिंदे गट), मतदान 559, तर पराभूत उमेदवार श्रद्धा लोहगावकर, भाजपा, मतदान 551, फरक 8 असा होता. त्रिवेणी सोमनाथ तुंगार या स्व. यादवराव यांच्या परिवारातील आहेत. त्यांनी यावेळी कैलास घुले यांचा पराभव केला आहे.
यावेळी ज्येष्ठ नेते राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) संपतराव सकाळे यांनी सांगितले की, त्र्यंबकेश्वरची निवडणूक ही धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा झालेला विजय आहे. राष्ट्रवादीच्या कार्यपद्धतीवर त्र्यंबकेश्वरच्या नागरिकांनी विश्वास ठेवला आहे. आम्ही तो व्यर्थ जाऊ देणार नाही, तर नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार यांनी सांगितले की, त्र्यंबकनगरीची सेवा करण्यासाठी नागरिकांनी मला संधी दिली आहे. ती संधी मी सार्थ करणार आहे. त्र्यंबकनगरीच्या विकासासाठी आणि आगामी सिंहस्थ कुंभमेळा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. कोणालाही बेघर अथवा बेरोजगार विस्थापित होऊ देणार नाही.
Shinde group's dominance in Trimbak, Kumbhnagar सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…
टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…
बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…
महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…
सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…