मंत्री सामंतांच्या उपस्थितीत उत्तर महाराष्ट्राची आज आढावा बैठक
नाशिक : प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे. शिवसेनेला (शिंदेसेना) मिळालेल्या यशानंतर होणार्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भगवा फडकवण्यासाठी शिवसेना ताकदीने कामाला लागली आहे. त्यानुसार उद्योगमंत्री उदय सामंत, माजी खासदार तथा उपनेते राहुल शेवाळे, सचिव भाऊसाहेब चौधरी आणि शिवसेना सचिव संजय मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्तर महाराष्ट्राची आज, सोमवारी (दि.11) हॉटेल एक्स्प्रेस इन येथे निवडणुकीच्या द़ृष्टीने आढावा बैठक होणार आहे. या बैठकीसाठी मंत्री गुलाबराव पाटील, दादा भुसे उपस्थित राहतील. सकाळी दहाला बैठकीस सुरुवात होईल.
शिवसेना मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रव्यापी दौर्याच्या अनुषंगाने पक्षाचे वरिष्ठ नेते राज्यभरातील पदाधिकार्यांशी संवाद साधत आहेत. यातील पुढील टप्पा उत्तर महाराष्ट्र असणार आहे. याआधी मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्र विभागातील बैठका पूर्ण केल्यानंतर उद्या हॉटेल एक्स्प्रेस इन, नाशिकमध्ये उत्तर महाराष्ट्रातील शिवसेना पदाधिकार्यांचा आढावा घेणार आहेत.
या बैठकीसाठी नंदुरबार, धुळे, जळगाव, अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. संघटनात्मक बळकटी, आगामी निवडणूक रणनीती व स्थानिक प्रश्नांवर सविस्तर चर्चा होणार आहे.
दरम्यान बैठकीला नेते, उपनेते, प्रवक्ते, आमदार, माजी आमदार, माजी खासदार, लोकसभा संपर्कप्रमुख, सहसंपर्क प्रमुख, जिल्हाप्रमुख, संघटक, समन्वयक, उपजिल्हाप्रमुख, विधानसभाप्रमुख, महानगरप्रमुख, तालुकाप्रमुख, शहरप्रमुख, आजी-
यावर होणार मंथन
प्राथमिक सदस्य नोंदणी, सक्रिय सदस्य नोंदणी, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका, अंगीकृत सेल, संलग्न संघटना पदाधिकारी नियुक्ती, जिल्हाप्रमुख ते बूथप्रमुख, गटप्रमुख नेमणुका व इतर संघटनात्मक आढावा घेतला जाणार आहे.
काही महिन्यांवर होणार्या जिल्हा परिषद,
महापालिका, नगरपालिका, नगरपरिषद
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे पक्षसंघटन संपूर्ण राज्यात मजबूत केले जात आहे. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रानंतर आज, सोमवारी नाशिक जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्राचा आढावा घेतला जाणार आहे. यावेळी पदाधिकार्यांशी संवाद साधून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सविस्तर चर्चा होणार आहे.
-भाऊसाहेब चौधरी, सचिव, शिवसेना शिंदे गट
पुरुषोत्तम नाईक मेष : अडचणी वाढतील या सप्ताहात बुध, शुक्र, राहू, केतू अनुकूल आहेत. शनिची…
बालाजी सोशल फाउंडेशनतर्फे भव्य देखावा उभारणीला सुरुवात नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी दरवर्षी अप्रतिम देखाव्यांसाठी ओळखल्या…
मनमाडला अस्मिता खेलो इंडिया वेटलिफ्टिंग स्पर्धा उत्साहात मनमाड : प्रतिनिधी भारतीय क्रीडा प्राधिकरण भारतीय वेटलिफ्टिंग…
आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा संशय मेशी : वार्ताहर खडकतळे येथून दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या नववीतील विद्यार्थिनी…
दुपारपासूनच फेरीला सुरुवात; ब्रह्मगिरीवर भक्तांची गर्दी त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी त्र्यंबकेश्वर येथे श्रावणाच्या तिसर्या सोमवारच्या ब्रह्मगिरी…
खामखेड्यातील सालगड्याचा मुलगा झाला पोलीस आदिवासी कुटुंबातील मुलाने प्रतिकूल परिस्थितीत मिळविले यश महेश शिरोरे खामखेडा:…