शिवसेना पदाधिकाऱ्यावर हल्ला

नाशिक : प्रतिनिधी

शिवसेना पदाधिकाऱ्यावर काल रात्रीच्या सुमारास महात्मा गांधी रोडवर अज्ञात हल्लेखोराने हल्ला केला. यशवंत व्यायाम शाळेजवळ  धारधार शस्त्राने केलेल्या हल्ल्यात मध्य नाशिक विधानसभा प्रमुख निलेश उर्फ बाळा कोकणे हे जखमी झाले आहेत. या हल्ल्यात त्यांच्या पाठीवर आणि डोक्यास वार करण्यात आले आहेत. कोकणे यांच्यावर खासगी  रूग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणाचा अधिक तपास भद्रकाली पोलीस करीत आहेत.मात्र त्यांच्यावर हल्ला का झाला हे अद्याप समजू  शकले नाही.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *