नाशिक

प्रभाग 26 मध्ये शिवसेना शिंदे गटाचा चौकार

एकाच पक्षाचे संपूर्ण पॅनल विजयी, तर भाजप व माकपचे प्रत्येकी दोन उमेदवार पराभूत

अ गट
निवृत्ती इंगोले
(मते 9,486)
तानाजी जायभावे
(6,231)
ब गट
हर्षदा गायकर
(11,654)
मोहिनी पवार
(4,592)
क गट
नयना जाधव
(8,663)
अलका अहिरे
(5,858)
ड गट
भागवत आरोटे
(8,418)
सचिन भोर
(6,153)

नाशिक महापालिका निवडणुकीत एकीकडे भाजपने बहुतांश प्रभागांत आपले पॅनल उभे करून प्रत्येकी चार उमेदवार दिले होते. त्याचवेळी शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांनी युती करून अनेक ठिकाणी प्रत्येकी चार उमेदवार उभे करून तोडीस तोड पॅनल देण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे दोन्ही बाजूने आपले संपूर्ण पॅनल निवडून येण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू होती. मात्र, यात ज्याप्रमाणे भाजपचे पॅनल बहुतांश ठिकाणी विजयी झाले तसा विजय शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांना अनेक ठिकाणी मिळविता आला नाही. मात्र, प्रभाग 26 मध्ये शिवसेना शिंदे गटाच्या चारही उमेदवारांनी विजय आपल्याकडे खेचून संपूर्ण पॅनल निवडून आणून बाजी मारली आहे, हे येथे उल्लेखनीय म्हणावे लागेल. कारण या प्रभागात उमेदवारी देण्यावरून आणि एबी फॉर्म मिळवण्याप्रकरणी भाजपमध्ये बरीच खटपट व लटपट झाली होती.
महापालिका निवडणुकीत लक्षवेधी लढत म्हणून प्रभाग क्रमांक 26 कडे पाहिले जात होते. गेल्या वेळेस या प्रभागातून शिवसेनेचे तीन उमेदवार विजयी झाले होते. यंदा मात्र संपूर्ण पॅनलच विजयी झाले आहे. या प्रभागातून अ गटातून निवृत्ती इंगोले, ब गटातून हर्षदा गायकर, क गटातून नयना जाधव आणि ड गटातून भागवत आरोटे विजयी झाले आहेत. यांपैकी हर्षदा गायकर आणि भागवत आरोटे यापूर्वी नगरसेवक राहिले असून, त्यांची ही दुसरी टर्म आहे. निवृत्ती इंगोले आणि नयना जाधव हे नगरसेवक म्हणून पहिल्यांदा निवडून आलेले आहेत.
भाजपच्या अलका अहिरे, नीलेश पाटील, मोहिनी पवार, रामदास मेदगे पराभूत झाले. याशिवाय माकपचे सचिन भोर, स्वप्ना माळी, ज्योती घाटोळ, मनसेचे अर्चना बागडे, निर्मला पवार हेही उमेदवार पराभूत झाले. माकपचे मातब्बर उमेदवार तानाजी जायभावे यांनाही पराभवाला सामोरे जावे लागले आहे. गेल्या निवडणुकीत या प्रभागातून दिलीप दत्तू दातीर (शिवसेना), हर्षदा संदीप गायकर (शिवसेना), अलका कैलास अहिरे (भाजप), भागवत पाराजी आरोटे (शिवसेना) या उमेदवारांनी विजय मिळवला होता.
प्रभाग क्रमांक 26 हा अंबड लिंक रोड आणि पवननगर परिसराभोवती केंद्रित असून, तो औद्योगिक क्षेत्राला लागून आहे. तसेच बहुचर्चित भंगार बाजाराचा परिसर व बाहेरच्या राज्यातून नोकरी व व्यवसायासाठी स्थायिक झालेल्या राहिवाशायांचा प्रभाग 26 मध्ये समावेश आहे. विशेष म्हणजे, हा प्रभाग सिडको भागातील शिवशक्ती चौक, खुटवडनगर, साळुंखेनगर, वावरेनगरसह अन्य परिसर व सातपूरमधील भंगार बाजार व मळे परिसर त्याचप्रमाणे अजमेरीनगर, संजीवनगर, रामकृष्णनगर, चुंचाळे, भोर टाउनशिप व परिसराचा भाग मिळून हा प्रभाग तयार करण्यात आला आहे. महत्त्वाचे म्हणजे पूर्वीपासून शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या या प्रभागातील तीनही माजी नगरसेवकांनी उद्धव सेनेतून शिंदेसेनेत प्रवेश केलेला आहे. खरेतर प्रभाग 26 हा संमिश्र मतदारांचा प्रभाव म्हणूनही ओळखला जातो. सन 2017 मध्ये झालेल्या महापालिका पंचवार्षिक निवडणुकीत विजय झालेल्या नगरसेवकांमध्ये भाजपच्या अलका अहिरे, तसेच उद्धवसेनेकडून हर्षदा गायकर, भागवत आरोटे व मधुकर जाधव आदींचा समावेश होता.
शिवसेना फुटीनंतर या प्रभागातील शिवसेना (उबाठा)मधील हर्षदा गायकर, भागवत आरोटे व मधुकर जाधव या तीनही माजी नगरसेवकांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. यामुळे या प्रभागात पूर्वी उद्धवसेनेचे वर्चस्व होते. मात्र, नुकत्याच झालेल्या घडामोडींमुळे प्रभागात शिंदेसेनेचे वर्चस्व झाल्याचे दिसते. या प्रभागात अलका अहिरे या एकमेव प्रबळ दावेदार होत्या. मात्र, त्यांच्याबरोबरच त्यांचे पती कैलास अहिरे यांनीदेखील निवडणुकीत उतरण्याची तयारी केली होती. परंतु भाजपचा एबी फॉर्म मिळविण्याच्या प्रकरणात बराच गोंधळ झाला. त्यानंतर बाचाबाचीही झाल्याने बरीच चर्चा रंगली होती. महायुतीतील भाजप या पक्षातही माजी नगरसेवक अलका अहिरे या एकमेव प्रमुख दावेदार असताना इतरांना उमेदवारी मिळवण्यासाठी बरीच धडपड करावी लागली परंतु उमेदवारी मिळूनही हे मतदानाची आकडेवारी बघीतली तर हे उमेदवार पराभूत होऊन एक ठिकाणी दुसर्‍या क्रमांका वर दोन ठिकाणी तिसर्‍या आणि चौथ्या क्रमांकावर फेकले गेले आहेत. एकीकडे भाजप पक्षातील इच्छुक उमेदवारांनाही उमेदवारी मिळण्यासाठी धडपड करावी लागली होती तर दुसरीकडे शिवसेना ( उबाठा ) राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट ) व मनसे या महाविकास आघाडी म्हणून एकत्र निवडणूक लढविली. महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांना मात्र तुल्यबळ उमेदवाराचा शोध घ्यावा लागला. मतांची आकडेवारी बघितली असता या प्रभागात शिवसेना आणि मनसेचे देखील उमेदवार हे चक्क चौथ्या क्रमांकावर होते.

Shiv Sena Shinde faction’s four-way battle in Ward 26

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

दादांची अकाली एक्झिट ! जिल्हा शोकसागरात

सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…

8 hours ago

स्मार्ट पार्किंगचे घोडे अडलेलेच!

टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…

9 hours ago

बांगलादेश क्रिकेट बोर्डाचा आत्मघातकी निर्णय

बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्‍या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…

9 hours ago

अजितदादांची साथ नेहमी स्मरणात राहील!

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…

9 hours ago

पवार परिवारावर आघात

महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…

9 hours ago

मीठसागरे शिवारात बिबट्या मादी जेरबंद

सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…

9 hours ago