नाशिक

रिंगरोडबाधितांच्या अन्नत्याग आंदोलनाला शिवसेनेचा पाठिंबा

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घडवून न्याय मिळवून देण्याचे आश्वासन

नाशिक : प्रतिनिधी
रिंगरोड प्रकल्पामुळे बाधित झालेल्या शेतकर्‍यांच्या न्याय्य मागण्यांसाठी छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांच्या नेतृत्वाखाली नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या आमरण अन्नत्याग आंदोलनाच्या पाचव्या दिवशी शिवसेना पक्षाने आंदोलनाला जाहीर पाठिंबा देत शेतकर्‍यांच्या मागण्या सोडविण्यासाठी सक्रिय भूमिका घेण्याचे आश्वासन दिले.
आंदोलनस्थळी शिवसेना पक्षाचे उपनेते तथा नाशिक जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते आणि उपमहापौर विलास शिंदे यांनी भेट देऊन करण गायकर व रिंगरोडबाधित शेतकर्‍यांशी सविस्तर चर्चा केली. यावेळी शेतकर्‍यांनी रिंगरोड प्रकल्पासंदर्भातील अन्यायकारक भूसंपादन प्रक्रिया, अलाइनमेंटमधील बदल, बाजारभावानुसार योग्य मोबदला, घरे, विहिरी, बोअरवेल, फळबागा आणि शेतीचे होणारे नुकसान याबाबतची माहिती संबंधित कागदपत्रे व पुराव्यांसह त्यांच्यासमोर मांडली. तसेच शेतकर्‍यांच्या वतीने त्यांच्या मागण्यांचे सविस्तर निवेदनही शिवसेना पदाधिकार्‍यांना
देण्यात आले.
यावेळी अजय बोरस्ते आणि विलास शिंदे यांनी शेतकर्‍यांना आश्वस्त करत सांगितले की, शिवसेना पक्षाच्या वतीने पुढील दोन दिवसांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन रिंगरोडबाधित शेतकर्‍यांच्या सर्व न्याय्य मागण्यांवर सकारात्मक निर्णय होण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. त्यांनी सांगितले की, उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याशीही या विषयावर दूरध्वनीद्वारे चर्चा
करण्यात आली.
शिवसेना पदाधिकार्‍यांनी शेतकर्‍यांनी सादर केलेल्या माहितीची गंभीर दखल घेत शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा करून शेतकर्‍यांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. यावेळी करण गायकर यांनी स्पष्ट भूमिका मांडताना सांगितले की, रिंगरोडबाधित शेतकर्‍यांना न्याय मिळेपर्यंत आणि शासनाकडून अधिकृत लेखी निर्णय होत नाही तोपर्यंत आमरण अन्नत्याग आंदोलन सुरूच राहील.
हा संघर्ष कोणत्याही व्यक्ती किंवा पक्षाविरोधात नसून, शेतकर्‍यांच्या न्याय्य हक्कांसाठी आहे.
आंदोलनाच्या पाचव्या दिवशीही विविध स्तरांतून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना महाले, दत्ता पाटील, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण संघाचे सरचिटणीस प्रदीप पेखळे, सुप्रसिद्ध शिवशाहीर स्वप्निल डोंगरे, प्रा. मुंगसे सर तसेच मराठा क्रांती मोर्चा जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पदाधिकारी आणि समाजबांधव यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन सक्रिय सहभाग नोंदवला व शेतकर्‍यांच्या लढ्याला जाहीर पाठिंबा दिला.

Shiv Sena supports the hunger strike by those affected by the Ring Road project.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

9 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

9 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

9 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

9 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

9 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

9 hours ago