महाराष्ट्र

मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याची विटंबना; शहरात शिवसेना ठाकरे गटाचे आंदोलन

नाशिक : प्रतिनिधी
मुंबईतील शिवाजी पार्क येथे माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची काही समाजकंटकांनी विटंबना केल्याची घटना बुधवारी (दि. 17) घडली. दरम्यान, त्याचे पडसाद नाशिकमध्येही उमटले. संतप्त शिवसैनिकांनी शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालय येथे एकत्र येत या घटनेचा निषेध नोंदवला. आंदोलन करत राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
पदाधिकार्‍यांनी माँसाहेबांच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पण करून दुग्धाभिषेक केला. जिल्हाप्रमुख डी. जी. सूर्यवंशी, राज्य संघटक विनायक पांडे, माजी आमदार वसंत गिते, उपजिल्हाप्रमुख भय्या मणियार, दिलीप मोरे, विधानसभाप्रमुख बाळासाहेब कोकणे, सुभाष गायधनी, समन्वयक शैलेश सूर्यवंशी, सचिव मसूद जिलानी, स्वाती पाटील, कीर्ती जवखेडकर, योगिता गायकवाड, कीर्ती निरगुडे, शोभा दोंदे आदी उपस्थित होते. शिवसेना पदाधिकारी सचिन बांडे, सुनील जाधव, सागर भोजने, राजेंद्र गोतिसे, ऋतराज पांडे, रितेश साळवे, संदेश फुले, गोरख वाघ, विशाल कदम, संजय परदेशी, अशोक पारखे, संजय चिंचोरे, वीरेंद्र टिळे, सुनील निरगुडे, सुभाष शेजवळ, प्रवीण चव्हाण, आकाश उगले, वैभव ढिकले, राजू राठोड, रवींद्र गामणे, देवा वाघमारे व शिवसेना पदाधिकारी, अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

खा. राजाभाऊ वाजेंकडून निषेध

दिवंगत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी व शिवसैनिकांच्या हृदयातील आदरणीय मातृशक्ती माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर मुंबईत अज्ञाताकडून लाल रंग टाकण्याची घृणास्पद व संतापजनक घटना बुधवारी (दि. 17) घडली. या कृत्यामुळे राज्यातील शिवसैनिक, ठाकरे कुटुंबीय व जनसामान्यांच्या भावना दुखावल्या असून, समाजात अस्वस्थता निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न झाला आहेे. लोकमान्य वंदनीय व्यक्तिमत्त्वांचा अपमान करणे ही समाजकंटक वृत्तीची नीच मानसिकता आहे. आपण या कृत्याचा तीव्र शब्दांत निषेध करतो. कारस्थान करणार्‍यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी, अशी मुंबई पोलीस प्रशासनाकडे मागणी आहे. मीनाताई ठाकरे यांचा पुतळा हा शिवसैनिकांच्या आदराचा, श्रद्धेचा आणि प्रेरणेचा स्रोेत आहे. त्यांचा अपमान कधीही सहन केला जाणार नाही, असे खासदार राजाभाऊ वाजे यांनी पत्रकाद्वारे म्हटले आहे.

 

 

Editorial Team

Recent Posts

फरार भूषण लोंढेच्या मुसक्या आवळल्या

फरार भूषण लोंढेच्या मुसक्या आवळल्या त्याच्यासह सहकार्‍याला नेपाळ सीमेजवळून अटक सिडको : विशेष प्रतिनिधी सातपूर…

17 hours ago

थेटाळेजवळ वाहनाच्या धडकेने तरुणाचा मृत्यू

लासलगाव : वार्ताहर निफाड तालुक्यातील थेटाळे शिवारात मंगळवारी दुपारी 2.30 च्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत…

19 hours ago

वृक्षतोड साधूंसाठी की संधिसाधूंसाठी?

हवेची शुद्धता राखण्यासाठी 33 टक्के वृक्ष, झाडी आणि बगीचा असणे गरजेचे आहे, पण झाडांची संख्या…

21 hours ago

सिन्नर नगरपरिषदेसाठी सरासरी 67.65 टक्के मतदान

मतदान यंत्रात किरकोळ तांत्रिक बिघाड; धक्काबुक्की, शाब्दिक बाचाबाची आणि तणावाचे वातावरण सिन्नर : प्रतिनिधी सिन्नरला…

21 hours ago

नाशिक जिल्ह्याची ओळख आता ‘बिबट्यांची पंढरी’?

देवगाव, रुई, गोंदेगाव, मरळगोई परिसरात बिबट्यांचा वाढता वावर लासलगाव : वार्ताहर द्राक्ष उत्पादनामुळे जागतिक ओळख…

21 hours ago

रासायनिक खतांच्या दरात पुन्हा वाढ

शेतकरी मेटाकुटीस; गोणीमागे 200 ते 250 रुपये अधिक मोजावे लागणार लासलगाव : वार्ताहर गेल्या काही…

21 hours ago