नाशिक

शिवसेनेची वाढली बार्गेनिंग पॉवर!

नाशिक : प्रतिनिधी
नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकीत जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाने बाजी मारत भाजपाच्या अति आत्मविश्वासाला सुरुंग लावला आहे. परिणामी महापालिका निवडणुकीच्या जागावाटपात नगरपरिषद निवडणुकीत मिळालेल्या यशामुळे शिवसेनेची महायुतीच्या जागावाटपात बार्गेनिंग पॉवर वाढली आहे. गेल्या दोन दिवसांपासून नाशिक मनपा जागावाटपाबाबत महायुतीच्या नेत्यांचे चर्चेचे गुर्‍हाळ सुरू आहे. मात्र, त्यावर एकमत होऊन अद्याप तोडगा निघू शकला नाही.
भाजपाला नाशिक महापालिकेवर एकहाती सत्ता मिळवायची आहे. काही महिन्यांपूर्वी मंत्री गिरीश महाजन यांनी शंभर प्लसचा नाराही दिला होता. मात्र, आता महायुती म्हणून तिन्ही पक्ष एकत्रित लढण्याची शक्यता असल्याने यंदाच्या निवडणुकीत भाजपाचे शंभर प्लसचे स्वप्न पूर्ण होणार नसले, तरी गेल्या निवडणुकीप्रमाणे यंदाही एकहाती सत्ता मिळवत भाजपाचा झेंडा नाशिक मनपावर फडकवायचे भाजपाचे उद्दिष्ट आहे. मात्र, नगरपरिषदांच्या निवडणुकीत अनपेक्षितपणे शिवसेनेच्या दादांनी योग्य रणनीती आखत भाजपाच्या भाऊंच्या वर्चस्वाला धक्का देण्याचा यशस्वी प्रयत्न केला. त्यामुळे महापालिका निवडणुकीतही शिवसेनेला जास्त जागांची अपेक्षा आहे. त्यामुळे तिन्ही पक्षांचे समाधानकारक जागावाटप होणार का? की तिन्ही पक्ष स्वबळावर निवडणूक लढणार, हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.
नाशिक जिल्ह्यात नगरपरिषद निवडणुकीत शिवसेना मोठा भाऊ ठरल्याने शिवसेनेच्या महापालिका निवडणुकीकडून अपेक्षा वाढल्या आहेत. जिल्ह्यात नगरपरिषदांप्रमाणे नाशिक मनपा निवडणुकीसाठी शिवसेनेचे नेते व शिक्षणमंत्री दादा भुसेच नेतृत्व करणार आहेत. शिवसेना- भाजपाची युती होणार की दोन्ही पक्ष स्वबळावर लढणार की मैत्रीपूर्ण लढती लढल्या जाणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र. सद्यःस्थितीत नगरपरिषद निवडणुकीच्या निकालामुळे शिंदेच्या शिवसेनेचा आत्मविश्वास वाढला असला, तरी जागावाटपात भाजपा शिवसेनेला योग्य मानसन्मान देत जागावाटप करणार का, हे पाहावे लागेल. अन्यथा शिवसेना स्वबळाचा नारा देण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Shiv Sena's bargaining power has increased!

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

19 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

19 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

20 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

20 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

20 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

20 hours ago