संस्मरणीय व्यक्तिमत्त्व स्व. शिवराम बोडके

रामशेज शिक्षण संस्थेचे संस्थापक शिवराम बोडके यांचा आज प्रथम स्मृतिदिन. त्यानिमित्त त्यांच्या स्मृतींना दिलेला उजाळा…
रामशेज शिक्षण संस्थेची स्थापना शिवराम बाबूराव बोडके यांनी 1992-93 मध्ये  केली. स्वत:ला शिक्षण घेण्यास आलेले अडथळे इतरांना येऊ नये, या हेतूने त्यांनी शिक्षण क्षेत्रात कार्य करण्याचे ठरवले. प्राथमिक शिक्षण घेताना त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. पंचवटी महाविद्यालयातून  पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले. पेठ फाटा येथे मासिक 15 रुपये भाडे देऊन सन 1974 पर्यंत शिक्षण घेतले. यादरम्यान नाशिक एम्पलॉयमेंट एक्स्चेंजमध्ये नावनोंदणी करून तब्बल 6 वर्षे सेवायोजन कार्यालयाकडून कोणत्याही प्रकारचा कॉल न आल्याने पुढे मुंबई सेवायोजन कार्यालयात नाव नोंदणी केली असता, एकाच महिन्यात मुंबई एम्प्लॉयमेंट कार्यालयामार्फत बँकेच्या क्लार्क, कॅशियर पदाचा कॉल आला. त्यानुसार रायटिंग / ओरल देऊन ते पात्र ठरले. परंतु निवड समितीने वेटिंग लिस्टला टाकले. तेव्हापासून ते नोकरीपासून वंचित
राहिले.
म्हणून  1974 साली शैक्षाणिक व मानसिक शालेय जीवनातील प्रचंड मेहनत घेऊन घेतलेल्या शिक्षणाने प्रचंड ऊर्जा मिळाल्याने उत्तम शेती व्यवसाय करण्यास सुरुवात केली. त्या बळावरच लोकसहभाग, समाजसेवा करण्याची आवड असल्याने गावकर्‍यांनी  त्यांना  11 नोव्हेंबर 1992ला बहुमताने निवडून दिले. जबाबदारी वाढल्यामुळे परिसरातील चार गावचा कारभार करण्यासाठी झपाटून कामाला लागले. त्यादरम्यान गावाच्या  व परिसराच्या विकासाच्या दृष्टीने प्रबोधन करण्यासाठी  अण्णा हजारे यांच्या राळेगणसिद्धी व पोपटराव पवार यांच्या  हिरवे बाजार येथे गावकर्‍यांची लक्झरी बसमध्ये मार्गदर्शनपर सहल काढली. त्या दरम्यान वृक्षसंवर्धन, मृद संधारण, पाणी अडवा-पाणी जिरवा व एक गाव-एकच ध्यास, गावचा सर्वांगीण विकास अशा स्वरूपाचे प्रबोधन शेकडो सहकार्यांच्या समवेत. पोपटराव पवार यांच्या मार्गदर्शनाने गावाच्या विकासाचा ध्यास घेतला. तसेच ठाणे येथील कोसबाड या ठिकाणी अनुताई वाघ यांच्या संस्थेवर कोसबाड येथील महिनाभराच्या प्रशिक्षणासाठी   बोथरासाहेब (गटविकास अधिकारी, दिंडोरी) यांनी निवड केली. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधील 50 सहकारी सरपंचांबरोबर त्यांनी  महिनाभराचे प्रशिक्षण पूर्ण केले. वरील दोन्ही ग्रामविकासाच्या  प्रशिक्षणाने  गावाच्या विकासासाठी मार्गदर्शन मिळाल्याने गावाचा विकास सर्व ग्रामस्थांना सोबत घेऊन विविध प्रकारच्या गाव व परिसराच्या सर्वच योजना त्यांनी  राबविल्या. शिवराम बोडके सरपंच असताना रामशेज आशेवाडी या ग्रुप ग्रामपंचायतीने दिंडोरी व नाशिक जिल्ह्यात ग्रामअभियानात प्रथम क्रमांक पटकावला. याचे रोख रकम 51,000 / – रुपये देऊन  शिवराम बोडके यांचा व  ग्रामस्थांचा आणि  ग्रामसेवक निकम यांच्यासह तत्कालीन समाजकल्याण मंत्री बबनराव घोलप यांच्या हस्ते  शाल, श्रीफळ, सुवर्णपदक, रोख रकमेने सत्कार करण्यात आला.
रामशेज शिक्षण संस्थेची पहिली शाळा मारुती मंदिर इमारतीत सुरुवात झाली. यात रामशेज शिक्षण संस्था संचलित रामशेज माध्यमिक विद्यालयात या दोन्ही संस्था एकाच वर्षात सुरू झाल्या. रामशेज माध्यमिक विद्यालय त्यांच्या माध्यमातून वटवृक्षाला अनेक पारंब्या व धुमारे फुटून वृद्धिंगत झाले आहे. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी, नाशिक व पेठ या तीन तालुक्यांत आणि औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण, फुलंब्री व औरंगाबाद या तालुक्यांत शैक्षणिक कार्य करत आहे. त्यात जवळपास 230 शिक्षक – शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या मदतीने संस्थेची प्रगती होत आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधून राष्ट्र समर्पित चारित्र्यसंपन्न पिढी घडविण्याचे काम ही संस्था करीत आहे. या ज्ञानरूपी दिव्याची ज्योत सतत तेवत ठेवून निष्काम गुणवत्ता व शिस्तीच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे. स्व. शिवराम बाबूराव बोडके यांचे राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रातील कार्य कायमच अविस्मरणीय राहील.  त्यांनी स्थापन केलेल्या संस्था ज्ञानदानाचे कार्य करीत आहेत.
रूपाली दशरथ बोडके

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *