सिन्नर : प्रतिनिधी
नाशिकहून पुण्याच्या दिशेने जाणारी राज्य परिवहन महामंडळाची शिवशाही बस सकाळी आठ वाजेच्या सुमारास सिन्नर जवळील माळवाडी (शिवाजीनगर) शिवारात जळून खाक झाली. नाशिक येथून सकाळी सात वाजेच्या सुमारास प्रवासी घेऊन शिवशाही बस पुण्याच्या दिशेने निघाली होती.
सिन्नर येथे थांबल्यानंतर ती पुढे संगमनेरच्या दिशेने मार्गस्थ झाली. तथापि, माळवाडी (शिवाजीनगर) शिवारात अचानक बसमधून धूर निघू लागल्याने चालकाने बस रस्त्याच्या कडेला उभी केली आणि सर्व प्रवासी बस खाली उतरले.क्षणार्धात बस पेटली. बसमधून आगेच्या ज्वाला बाहेर पडू लागल्या सुदैवाने सर्व प्रवासी सुखरूप बचावले. सदर आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सर्व प्रवासी सुखरूप असल्याने समाधान व्यक्त करण्यात आले. तथापि, बस जळून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
घिबली अॅपची कमाल मशालच्या जागी कमळ! मनमाड : आमिन शेख सध्याचा जमाना डिजिटलचा आहे. दररोज…
नियोजित वधुचे अफेअर उघड विवाहापूर्वीच आयकर अधिकारी असलेल्या वराने संपविले जीवन नाशिक : प्रतिनिधी नियोजित…
लासलगाव येथे पटेल सॉ मिलला आग श्री सिद्ध वीर हनुमान मित्र मंडळाच्या अग्निशमन टँकर मुळे…
भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती अमाप उत्साहाने नाशिकरोड ः वार्ताहर…
शिधापत्रिकांची होणार तपासणी सिन्नर प्रतिनिधी तालुक्यात तहसिल कार्यालयातील पुरवठा विभागामार्फत बोगस व अपात्र शिधापत्रिका शोध…
80 फेर्या सुरू; कमी दाबाच्या पाण्यामुळे नागरिक त्रस्त नाशिक : प्रतिनिधी वाढलेल्या तापमानाबरोबर शहरातील विविध…