टोकियो : गोळीबारात गंभीर जखमी झालेले जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांचे उपचार सुरू असताना निधन झाले. शिंजो आबे यांच्यावर नारा शहरातील एका प्रचारसभेत ते बोलत असतानाच गोळीबाराची घटना घडली होती. त्यांच्या छातीत गोळी लागल्याने ते स्टेजवरच कोसळले होते. बेशुद्ध अवस्थेतच त्यांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले होते. तेथे उपचार सुरू असतानाच त्यांचे निधन झाल्याचे वृत्त जपानमधील एनएचके वर्ल्ड न्यूजने दिले होते. या प्रकरणी पोलिसांनी नारा शहरातील यामागामी तेत्सुयाला यास अटक करण्यात आली आहे. त्याच्याजवळील बंदुकही जप्त करण्यात आली. नारा शहरात लिबरल डेमोक्रेटिक पक्षाच्या उमेदवाराचा ते प्रचार करत होते. भाषण सुरू असतानाच त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. शिंजो आबे यांच्यावरील हल्ल्याचा जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांनी तीव्र शब्दात निषेध केला. घटनास्थळी असलेल्यांपैकी एका महिलेने सांगितले की, हल्लेखोराने दोन गोळ्या झाडल्या.पहिली गोळी लागताच ते खाली कोसळले. छातीत गोळी लागल्यामुळे त्यांना ह्दयविकाराचा धक्काही बसला.गोळी झाडल्यानंतर हल्लेखोर येथेच थांबून होता. त्यानंतर पोलिसांनी त्याला पकडले.
मुंबई: शोर, क्रांती, रोटी कपडा और मकान यासारख्या एकसे बढकर एक चित्रपटातून आपल्या अभिनयाचा ठसा…
गोदावरीचे गटारीकरण तात्काळ थांबवा गोदावरी जतन व संवर्धन संघर्ष समितीचे निवेदन नाशिक : प्रतिनिधी गोदावरीचे…
नाशिक : प्रतिनिधी एसएमबीटी मेडिकल सायन्सेस अॅण्ड रिसर्च सेंटर, एसएमबीटी डेंटल कॉलेज संगमनेर, एसएमबीटी इन्स्टिट्यूट…
नाशिक : प्रतिनिधी जिल्हाधिकारी कार्यालयात कुंभमेळा कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. उपजिल्हाधिकारी भूसंपादन अधिकारी रवींद्र…
कांद्याचे निर्यात शुल्क कमी होऊनही दरात घसरण, शेतकर्यांत चिंता सिन्नर : प्रतिनिधी केंद्र शासनाने कांद्यावरील…
कांद्याचे निर्यात शुल्क कमी होऊनही दरात घसरण, शेतकर्यांत चिंता सिन्नर : प्रतिनिधी केंद्र शासनाने कांद्यावरील…