नगर परिषदेत धक्कादायक निकाल, भगूरला सेनेला धोबीपछाड,प्रेरणा बलकवडे नगराध्यक्ष

नाशिक: जिल्ह्यातील अकरा नगर परिषदेच्या निवडणुकीत अनेक ठिकाणी धक्कादायक निकाल लागले आहेत. शिवसेना आणि अजित पवार गट यांच्यात समोरासमोर झालेल्या लढतीत अजित पवार गटाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रेरणा बलकवडे या विजयी झाल्या, गेल्या तीन पंचवार्षिक पासून सत्ता उपभोगणार्या विजय करंजकर यांच्या पत्नी अनिता करंजकर यांचा धक्कादायक पराभव झाला,

चांदवड मध्ये भाजपने वर्चस्व राखलं

वैभव बागुल नगराध्यक्षपदी
चांदवड (वार्ताहर):-
नाशिक जिल्ह्यातील लक्षवेधी ठरलेल्या चांदवड नगरपरिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मुसंडी मारली आहे. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपचे वैभव विजय बागुल यांनी ६,९२५ मते मिळवून शानदार विजय संपादन केला. नगरसेवक पदाच्या २० जागांपैकी ११ जागांवर भाजपने कब्जा मिळवत निर्विवाद सत्ता काबीज केली आहे.
ठळक मुद्दे:
* नगराध्यक्ष: वैभव बागुल (भाजप) – विजयी (६,९२५ मते)
* भाजप: ११ जागांसह सर्वात मोठा पक्ष.
* अपक्ष: ५ जागांवर अपक्षांचा विजय, राजकीय गणिते बदलली.
* इतर: शिवसेना (२), राष्ट्रवादी श.प. (१), शिवसेना उबाठा (१).
विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी:
* प्रभाग १: प्रियंका राऊत (भाजप), सुधीर कबाडे (राष्ट्रवादी श.प.)
* प्रभाग २: मंगल मोरे (अपक्ष), राजू बागवान (अपक्ष)
* प्रभाग ३: प्रसाद सोनवणे (अपक्ष), नयना वाघ (अपक्ष)
* प्रभाग ४: पल्लवी मोरे (शिवसेना), संदीप (तात्या) उगले (शिवसेना)
* प्रभाग ५: मनिषा भालेराव (भाजप), भूषण कासलीवाल (भाजप)
* प्रभाग ६: जीवन देशमुख (भाजप), राजश्री प्रजापत (शिवसेना उबाठा)
* प्रभाग ७: कमल जाधव (भाजप), राहुल कोतवाल (भाजप)
* प्रभाग ८: अनिता बडोदे (भाजप), महेंद्र (मुन्ना) गांधी (भाजप)
* प्रभाग ९: प्रदीप बनकर (अपक्ष), सरला अग्रवाल (भाजप)
* प्रभाग १०: संभाजी गुंजाळ (भाजप), लीलाबाई कोतवाल (भाजप)
सर्वाधिक मते:
भाजपचे जीवन देशमुख यांनी प्रभाग ६ ‘अ’ मधून ९१२ मते घेत विजयाचा नवा विक्रम प्रस्थापित केला.
निकाल जाहीर होताच शहरात गुलालाची उधळण सुरू झाली असून कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला आहे. नगराध्यक्ष वैभव बागुल यांनी या विजयाचे श्रेय चांदवडच्या जनतेला दिले आहे.

इगतपुरीत भाजपला धक्का

नगराध्यक्ष पदाचे शालीनी खातळे ( शिवसेना शिंदेगट ) विजयी
शिवसेना व राष्ट्रवादीचे १८ उमेदवार विजयी
भाजपाचे २ उमेदवार विजयी
व उबाठाचे १ उमेदवार विजयी .

सिन्नरला अजित पवार गटाचा नगराध्यक्ष

सिन्नर मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे विठ्ठल उगले नगराध्यक्षपदी विजयी

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *