दुकान निरीक्षक लाच घेताना जाळ्यात
नाशिक: प्रतिनिधी
कामगार उपायुक्त कार्यालयातील दुकान निरीक्षक निशा आढाव यांना पाच हजार रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले, मागच्याच आठवड्यात मनपा शिक्षण अधिकारी सुनीता धनगर यांना पकडले होते, आज पुन्हा एका महिला अधिकारी लाच घेताना जाळ्यात सापडल्याने लाचखोरीत महिला देखील मागे नसल्याचा प्रत्यय येत आहे,
तक्रारदार यांचे हॉटेल असून हॉटेलमध्ये बालकामगार असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर कामगार उपायुक्त कार्यालयातील दुकान निरीक्षक निशा आढाव यांनी हॉटेल चालकास बालकामगार नसल्याचा निरंक अहवाल देण्यासाठी पाच हजार रुपये ची लाच मागितली होती तक्रारदाराने याबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा घारगे वालावलकर अप्पर अधीक्षक माधव रेड्डी उपाध्यक्ष नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपाधीक्षक अनिल बडगुजर पोलीस नाईक मनोज पाटील शितल सूर्यवंशी अजय गरुड यांच्या पथकाने सापळा रचला त्यात निशा आढाव कामगार उपायुक्त कार्यालयात पाच हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ जाळ्यात अडकल्या. याबाबत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…
नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्या…