नाशिक

स्वार्थासाठी पक्ष सोडणार्‍यांना जागा दाखवा ः खासदारवाजे

विहितगाव, चेहेडीत शिवसेना ठाकरे गटाची बैठक

नाशिक : प्रतिनिधी
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसांच्या न्याय्य हक्कांसाठी स्थापन केलेला शिवसेना पक्ष आहे. परंतु, कोणीतरी येतो आणि पक्ष चोरून नेतो. ज्यांना बाळासाहेबांनी मोठे पद दिले, मोठे केले तेच स्वत:च्या फायद्यासाठी पक्ष सोडून जात आहेत. मात्र, स्वार्थासाठी पक्ष सोडणार्‍यांना त्यांची जागा दाखवा. हा पक्ष सांभाळण्याची जबाबदारी सामान्य शिवसैनिकांवर आली आहे. ती जबाबदारी पार पाडण्याची वेळ आता आली आहे, असे आवाहन खासदार राजाभाऊ वाजे यांनी केले.

‘मातोश्री’वरून आलेल्या आदेशाने आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कामाला लागण्यासाठी विभागनिहाय बैठका घेऊन शिवसेनेची ध्येयधोरणे मतदारांपर्यंच पोहोचवण्यासाठी या बैठका घेण्याच्या सूचना स्थानिक पदाधिकार्‍यांना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार प्रभाग 22 ची बैठक विठ्ठल मंदिर, विहितगाव येथे, तर प्रभाग 19 ची बैठक चेहेडी येथील हनुमान मंदिरात झाली. तीत खासदार राजाभाऊ वाजे
बोलत होते.
बैठकीला उपनेते सुनील बागूल, नवनिर्वाचित उपनेते दत्ता गायकवाड, जिल्हाप्रमुख डी. जी. सूर्यवंशी, माजी आमदार वसंत गिते, लोकसभा संघटक बाळासाहेब पाठक, कोअर कमिटीचे केशव पोरजे, भारती ताजनपुरे, युवासेना जिल्हाधिकारी राहुल तानपुरे, भाविसे जिल्हा संघटक वैभव ठाकरे, उपजिल्हाप्रमुख भय्या मणियार, जिल्हा सचिव मसूद जिलानी, योगेश गाडेकर, माजी महापौर नयना घोलप, माजी नगरसेवक संतोष साळवे, सुनीता कोठुळे, आंबादास ताजनपुरे, व्यापारी बँकेचे संचालक अरुण जाधव, योगेश भोर व्यासपीठावर उपस्थित होते. दोन्ही बैठकांना प्रभागातील पदाधिकारी विकास गिते उपस्थित होते.
उपनेते गायकवाड म्हणाले, की शिवसेना पक्ष नेहमी सर्वसामान्यांच्या समस्या व त्यांच्या सुख-दुःखात धावणारा पक्ष म्हणून पुढे आलेला आहे. त्यामुळे शिवसैनिकांनी यापुढेही सर्वसामान्यांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असल्याचे म्हटले. उपनेते बागूल म्हणाले, की गेल्या 50 ते 55 वर्षांत बाळासाहेबांनी स्थापन केलेल्या शिवसेनेने सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडून पक्ष मोठा केला. मात्र, भाजपाने शिवसेनेचेच लोक फोडून, सर्वसामान्यांशी खोटे बोलून चार वर्षांत मोठेपण मिरवत आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख सूर्यवंशी व माजी आमदार वसंत गिते यांनी गेल्या तीन-साडेतीन वर्षांपासून निवडणूक घेण्याची मागणी करूनही सरकार निवडणुका घेत नव्हते. त्यांना भीती होती की, मताचे दान आपल्या झोळीत पडणार नाही. पण न्यायालयाने निवडणुका घेण्यास सांगितल्याने निवडणुका आता होणार आहेत. त्यादृष्टीने सर्वांना तयारी करा, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी उपमहानगरप्रमुख किरण डहाळे, समन्वयक रमेश पाळदे, दीपक अस्वले, राहुल मगर, दया भोर, योगेश सोनवणे, रवींद्र
कर्जेकर, राजू सोनवणे, भाऊसाहेब वेल्हाळ, विभागप्रमुख शेखर पवार, स्वप्नील औटे, नाना शिंदे, समन्वयक चंदू महानुभाव, उत्तम कोठुळे, वैभव नाना ताजनपुरे, भूषण पवार, गोकुळ मानकर, मंदाताई गवळी, बबनराव मानकर, भगवान घोडे, राहुल भोर, भाऊसाहेब हराळे, अमोल आल्हाट, अन्सार शेख, संजय कोठुळे, विक्रम थोरात, जयश्री गाडेकर, राहुल चाटोले, स्वप्नील सहाणे, कुणाल सहाणे, सलीम शेख आदी पदाधिकार्‍यांंसह शिवसैनिक
उपस्थित होते.

Gavkari Admin

Recent Posts

भाजपा नाशिक महानगर जिल्हा कार्यकारिणी जाहीर

नाशिक महानगर जिल्हाध्यक्ष सुनील केदार नाशिक : प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाच्या नाशिक महानगर जिल्ह्याची सन…

1 day ago

रेशन दुकानदारांच्या मार्जिनमध्ये 20 रुपये वाढ

मंत्रिमंडळाचा निर्णय; दुकानदारांमध्ये नाराजी नाशिक : प्रतिनिधी राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या अंतर्गत राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेच्या…

1 day ago

नाशकात चारशे मतदान केंद्रे वाढणार

नगरविकासकडून निवडणूक आयोगाला प्रस्ताव सादर नाशिक : प्रतिनिधी शहरात होणार्‍या महापालिका निवडणुकीसाठी मतदान केंद्रांची संख्या…

1 day ago

जिल्ह्यात दहशत बिबट्याची, पर्वणी चोरांची

अफवांची गावभर चर्चा; ग्रामीण भागात नागरिकांचा जागता पहारा निफाड : तालुका प्रतिनिधी गेल्या काही दशकापासून…

1 day ago

सिन्नरला अतिक्रमणांवर हातोडा; रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास

मुख्याधिकारी कदम यांची धाडसी कारवाई सिन्नर : प्रतिनिधी अतिक्रमणे काढण्यासाठी नगरपालिकेच्या वतीने आठवडाभर अगोदर नोटिसा…

1 day ago

पाच कोटी द्या, दीड लाख मतांची सेटिंग करू देतो…

गुजरातच्या व्यक्तीने त्यावेळी संपर्क केल्याची माजी आमदार चव्हाण यांची माहिती सटाणा ः प्रतिनिधी ईव्हीएम मॅनेज…

1 day ago