नाशिक

कोयत्याचा धाक दाखवून एस.टी.बस चालक-वाहकास लूटले

धामणगांव :वार्ताहर

इगतपुरी तालुक्यातील धामणगांव येथे मुक्कामी बसचे चालक वाहक यांना कोयत्याचा धाक दाखवून लूटल्याची घटना घडली, यामुळे गावोगावी मुक्कामी थांबणाऱ्या बसचालक वाहक यांची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे उघड झाले आहे,

इगतपुरी  ते नाशिक , नाशिक ते कसारा,कसारा ते नाशिक,नाशिक ते वासाळी असा प्रवास करून एस टी क्रमांक एम.एच – १४ बी.टी- ३२७२ धामणगांव टाकेद रस्त्याचे काम चालू असल्यामुळे एस टी महामंडळाच्या आदेशावरून वासाळी येथे मुक्कामी न जाता धामणगांव येथील एच.पी गॅस एजन्सी समोर टाकेद फाटा येथे मुक्कामा साठी चालक शिवाजी डगळे व वाहक काशिनाथ दवंडे यांनी थांबवली, रात्री ८:३० वाजता जेवण करून दिवसभर प्रवासी वाहतुकीचे रक्कम ११५५० रुपये सुटे नाणे वगळता आपल्या जवळ असलेल्या बॅग मध्ये टाकून महामंडळाच्या पत्र्याच्या पेटीत ठेवली होती, सोबत वाहकाचे परवाना व तिकिटाचे ट्रे ठेवून बसच्या शेवटच्या सीटवर उशाशी घेऊन वाहक दवंडे झोपले होते. चालक डगळे हे प्रवासी चढतात त्या समोरील सीटवर झोपले एस.टी चालक – वाहक झोपलले असतांना रात्री १:००वाजता ड्रायव्हरच्या बाजूने दरवाज्याला काच नसल्यामुळे तीन चोर चढले , गाडीत कोणीतरी चढल्याचा आवाज आल्यामुळे चालक उठले कोण ये कोण ये म्हणताच चोरांनी चालकाच्या तोंडावर हाताने मारले व कोयता दाखवून आवाज करू नको पैसे कुठे असे विचारले , चालक घाबरल्यामुळे त्याने वाहकाकडे पैसे आहे असे सांगून दिले तेवढ्यात दोन चोरांनी वाहकाला मारहाण केली.  वाहकाच्या जवळ असलेल्या पत्र्याची पेटी उचलून एस.टी च्या बाहेर  चोर पळाले.  वाहक व चालक यांनी त्यांच्या माघे धाव घेतली मात्र चोर हे त्यांच्या दुचाकीवर बसून पसार झाले.  त्या नंतर चालक वाहक यांनी घोटी पोलीस स्टेशनमध्ये माहिती दिली असता नाशिक ग्रामीण चे पोलीस उपअधीक्षक अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली घोटी पोलीस स्टेशन सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर , सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब राऊत , पोलीस हवालदार सुहास गोसावी , पोलीस नाईक केशव बस्ते,सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गांगुर्डे पोहचले व पुढील तपास सुरू केला आहे.

 

 

 

प्रवाशांच्या सेवेसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ अशी ओळख असलेल्या लालपरीवर जर असा हल्ला होत असेल तर भविष्यात मुक्कामी गाड्या बंद होतील. पोलिसांनी ह्या प्रकरणाची सखोल चौकशी करून गुन्हेगारावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. तसेच घोटी सिन्नर महामार्गावर कायमस्वरूपी गस्त वाढविल्यास रात्रीच्या वेळेस होणारी वाटमारी रोखविण्यास मदत होईल.
महेश गाढवे
शिवसंग्राम जिल्हा कार्याध्यक्ष

Ashvini Pande

Recent Posts

नाशिक खुनाच्या घटनेने हादरले, कुकरचे झाकण, कोयत्याने मारल्याने पत्नीचा मृत्यू

सिडको: विशेष प्रतिनिधी घरातील आपआपसांतील वाद पराकोटीला गेल्याने नवऱ्याने रागाच्या भरात मंगळवारी (दि.४) राहत्या घरात…

14 hours ago

सुला फेस्टचा समारोप

*हिप हॉप रॅपवर थिरकत फुल टु एन्जॉय करत इलेक्ट्रिफाईंग वातावरणात दोन दिवसीय सुला फेस्टचा समारोप*…

3 days ago

सापुतारा जवळ बस दरीत कोसळून पाच प्रवाशी ठार

सापुतारा जवळ बस दरीत कोसळून पाच प्रवाशी ठार ४५ प्रवासी जखमी. सुरगाणा : प्रतिनिधी वणी…

3 days ago

दारूच्या नशेत पतीने पत्नीला पेटवले

दारूच्या नशेत पतीने पत्नीला पेटवले महिला गंभीर जखमी; सातपूरची घटना सातपूर : प्रतिनिधी सातपूर नाशिक…

5 days ago

स्वयंपाक करत असताना गॅस शेगडीवरील काच फुटली, गृहिणी बालंबाल बचावली

स्वयंपाक करत असताना गॅस शेगडीवरील काच फुटली, गृहिणी बालंबाल बचावली सिडको : विशेष प्रतिनिधी चुंचाळे…

6 days ago

नांदगाव चाळीसगाव रस्त्यावर कार दुचाकी अपघातात पती-पत्नी ठार ; दोन जण गंभीर जखमी

नांदगाव चाळीसगाव रस्त्यावर कार दुचाकी अपघातात पती-पत्नी ठार ; दोन जण गंभीर जखमी मनमाड :आमिन…

6 days ago