नाशिक : प्रतिनिधी
येथील डिसुझा कॉलनी कॉलेजरोड प्रौढ मित्र मंडळातर्फे आयोजित श्रावण गायन कार्यक्रम उत्साहात झाला. रागिणी कामतीकर यांच्या शिष्य स्वाती पाचपांडे व अनिता भसे यांनी हा कार्यक्रम सादर केला. यात माय मराठी माय भवानी,केतकीच्या वनी नाचला मोर, येरे घना यासह सुगंध गारवा मध्येच मारवा , नैनोमे गजरा, बोले रे पपी हरा,मेघमल्हार सादर करून रंग त वाढवत नेली ,तसेच बरखा बहार आयी या सारखे अप्रतिम गाणे अनिता व स्वाती यांनी सादर करून मने जिंकली. सुरुवात सौ कल्पना कुवर यांनी प्रार्थना सादर केली व अध्यक्ष डॉ शरद पाटील यांनी स्वागत व प्रास्तविक केले सूत्र संचलन डॉ प्रा लक्ष्मीकांत भट यांनी केले.गायिकेचा परिचय चंद्रकला जोशी यांनी करुन दिला. त्यांचा सत्कार अध्यक्ष डॉ शरद पाटील यांनी केला. सभासदांचे वाढदिवस गायिका भसे अनिता, डॉ शरद पाटील,सचिव प्रदिप देवी यांच्या हस्ते झाले.खजिनदार सुरेश कादी यांनी आभार मानले.
बँकेची विशेष सर्वसाधारण सभा विविध विषयांवरून गाजली नाशिक : प्रतिनिधी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची…
ग्रामीण भागात पुरुष अग्रेसर, शहरात मात्र अनास्था नाशिक ः प्रतिनिधी कुटुंबात एक किंवा दोन मुले…
शिंदे सेनेसह ठाकरे गट, मनसेचा पर्याय; नव्या समीकरणाकडे लागले लक्ष नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या…
मालेगावला संगमेश्वरमधील जमीन चुकीच्या पद्धतीने केली वर्ग एक मालेगाव : नीलेश शिंपी शहरातील संगमेश्वर येथील…
वाखारीत आज रिंगण सोहळा; वर्षानंतर संतांची गळाभेट, त्यानंतर नगर प्रवेश त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी आषाढवारीसाठी निघालेली…
मे महिन्यात 42 टक्क्यांची विक्रमी वाढ नाशिक : प्रतिनिधी नाशिकच्या ओझर विमानतळावरून प्रवास करणार्या प्रवाशांची…