पंधरा दिवसांत दहा लाख भाविक श्री मतोबांच्या चरणी नतमस्तक
निफाड : विशेष प्रतिनिधी
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान, नैताळे ग्रामस्थांचे आराध्य दैवत श्री मतोबा महाराज यात्रोत्सवाला 3 जानेवारीला उत्साहात प्रारंभ झाला. हा यात्रोत्सव 18 जानेवारीपर्यंत अखंड सुरू होता. पंधरा दिवसांत जवळपास दहा लाख भाविक श्री मतोबा महाराजांच्या चरणी नतमस्तक झाल्याची माहिती देवस्थान ट्रस्टने दिली.
नाशिक- छत्रपती संभाजीनगर महामार्गावर असलेल्या नैताळे येथे यंदाही पौष पौर्णिमेला श्री मतोबा महाराज यात्रोत्सव भरविण्यात आला. हा उत्सव अखंड 15 दिवस सुरू होता. यात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी पहाटे पाचला भागवताचार्य हभप ज्ञानेश्वर माउली शिंदे, सुनील जैन, भारती जैन, तसेच दर्शन रांगेत उभ्या असलेले भाग्यवान भाविक म्हणून प्रवीण पाटील, अनिता पाटील यांच्या हस्ते श्री मतोबा महाराजांच्या नवीन चांदीच्या मूर्तीची ‘महापूजा‘ करण्यात आली.
सकाळी नऊला बोकडदरे येथील भारतमाता आश्रमाचे महंत श्री महामंडलेश्वर 108 जनेश्वरानंदगिरी महाराज व रथाचे मानकरी मोहन खापरे यांच्या हस्ते रथ मिरवणुकीला प्रारंभ झाला होता. यंदा रथ मिरवणुकीला प्रारंभ करताना रथाला पहिली बैलजोडी जुंपण्याचा मान सिन्नर तालुक्यातील भाटवाडी येथील शेतकरी नंदकिशोर महात्मे यांना देण्यात आला होता. भाविकांचे दर्शन सहज सुलभ व्हावा म्हणून दर्शन रांगेची व मंडपाची व्यवस्था केली होती. मंदिर परिसरात अनेक ‘प्रसाद‘ व्यावसायिकांना जागा उपलब्ध करून दिली होती. मंदिरावर आकर्षक रोषणाई केली होती. मंदिर व परिसरात गर्दीच्या नियंत्रणासाठी स्वयंसेवकाच्या नेमणुका केलेल्या होत्या. भाविकांना पिण्यासाठी शुद्ध पाण्याची व्यवस्था केली होती. नारळ फोडण्यासाठी मशिनची व्यवस्था केली होती. यात्रा कालावधीत रोज सकाळी सहा, दुपारी बारा व सायंकाळी सातला संगीतबद्ध आरतीचे नियोजन केले होते. लासलगाव बाजार समितीच्या माजी सभापती सुवर्णाताई जगताप यांच्या हस्ते श्री मतोबा महाराजांची महाआरती करून पंधरा दिवसांनंतर यात्रोत्सवाची सांगता केली.
यात्रोत्सवाच्या 15 दिवसांच्या कालखंडात निफाड पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवून महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. नैताळे प्राथमिक आरोग्य केंद्राची आरोग्य टीम कार्यतत्पर राहून यात्रा कालावधीत कुठल्याही रोगराईचा प्रसारहोणार नाही याची काळजी घेतली. सरपंच निशा पाठक, उपसरपंच मोतीराम भवर, ग्रामविकास अधिकारी उज्ज्वला भोईर व सदस्य मंडळाच्या सूचनेनुसार व्यावसायिक, भाविक व ग्रामस्थांना वेळोवेळी रस्ते, पाणी, स्वच्छता उपलब्ध करून देण्यात आली. यात्रोत्सवात सहभागी सर्व घटकांनी देवस्थान ट्रस्ट व ग्रामपंचायत व्यवस्थापनाला वेळोवेळी मदत केली.
– गायत्री बोरगुडे, अध्यक्ष, यात्रा कमिटी, ग्रामपंचायत नैताळे
Shri Matoba Maharaj concludes the Yatrotsav with enthusiasm
न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…
मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…
डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…
वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…
नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…
महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…