मुकणेतील शेतकर्यांचे 10-12 लाखांचे नुकसान
मुकणे : प्रतिनिधी
इगतपुरी तालुक्यातील मुकणे येथील शेतकर्यांच्या वाडीवर्हे शिवारातील गट नंबर 445, 446 व 447 मधील तोडण्यायोग्य व तोडून ठेवलेला ऊस विजेच्या तारांच्या घर्षणामुळे शॉर्टसर्किट होऊन जळून खाक झाला. या शेतकर्याचे जवळपास 10-12 लाख रुपयांचे नुकसान झाले असून, महावितरण कंपनी व साखर कारखाना प्रशासनाने या शेतकर्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे. मुकणे येथील नारायण रघुनाथ राव, किसन रघुनाथ राव, गोपाळ पांडुरंग राव व भाऊसाहेब गणपत राव या शेतकर्यांचे वाडीवर्हे शिवारात उसाचे क्षेत्र आहे.
शेतकर्यांचा याच पिकावर वर्षभराचा घरखर्च व उदरनिर्वाह चालतो. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून कारखाण्याकडून ऊस तोड होण्याची हे शेतकरी वाट पाहत होते त्यातील काही ऊस हा तोडून ठेवलेला होता मात्र लवकर ऊसतोड तर झालीच नाही.काही तोडलेला ऊस कारखान्याने लवकर न नेल्याने शेतातील लोंबकळणार्या तारांचा शॉर्टसर्किट होऊन तोडणीयोग्य असणारा एकर ऊस जळून खाक झाल्याने शेतकर्यांचे जवळपास 10-12 लाख रुपयांचे नुकसान झाले.
हे ही वाचा…
मुंबई: शोर, क्रांती, रोटी कपडा और मकान यासारख्या एकसे बढकर एक चित्रपटातून आपल्या अभिनयाचा ठसा…
गोदावरीचे गटारीकरण तात्काळ थांबवा गोदावरी जतन व संवर्धन संघर्ष समितीचे निवेदन नाशिक : प्रतिनिधी गोदावरीचे…
नाशिक : प्रतिनिधी एसएमबीटी मेडिकल सायन्सेस अॅण्ड रिसर्च सेंटर, एसएमबीटी डेंटल कॉलेज संगमनेर, एसएमबीटी इन्स्टिट्यूट…
नाशिक : प्रतिनिधी जिल्हाधिकारी कार्यालयात कुंभमेळा कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. उपजिल्हाधिकारी भूसंपादन अधिकारी रवींद्र…
कांद्याचे निर्यात शुल्क कमी होऊनही दरात घसरण, शेतकर्यांत चिंता सिन्नर : प्रतिनिधी केंद्र शासनाने कांद्यावरील…
कांद्याचे निर्यात शुल्क कमी होऊनही दरात घसरण, शेतकर्यांत चिंता सिन्नर : प्रतिनिधी केंद्र शासनाने कांद्यावरील…