शॉर्टसर्किटमुळे ऊस जळून खाक

मुकणेतील शेतकर्‍यांचे 10-12 लाखांचे नुकसान

मुकणे : प्रतिनिधी
इगतपुरी तालुक्यातील मुकणे येथील शेतकर्‍यांच्या वाडीवर्‍हे शिवारातील गट नंबर 445, 446 व 447 मधील तोडण्यायोग्य व तोडून ठेवलेला ऊस विजेच्या तारांच्या घर्षणामुळे शॉर्टसर्किट होऊन जळून खाक झाला. या शेतकर्‍याचे जवळपास 10-12 लाख रुपयांचे नुकसान झाले असून, महावितरण कंपनी व साखर कारखाना प्रशासनाने या शेतकर्‍यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे. मुकणे येथील नारायण रघुनाथ राव, किसन रघुनाथ राव, गोपाळ पांडुरंग राव व भाऊसाहेब गणपत राव या शेतकर्‍यांचे वाडीवर्‍हे शिवारात उसाचे क्षेत्र आहे.

शेतकर्‍यांचा याच पिकावर वर्षभराचा घरखर्च व उदरनिर्वाह चालतो. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून कारखाण्याकडून ऊस तोड होण्याची हे शेतकरी वाट पाहत होते त्यातील काही ऊस हा तोडून ठेवलेला होता मात्र लवकर ऊसतोड तर झालीच नाही.काही तोडलेला ऊस कारखान्याने लवकर न नेल्याने शेतातील लोंबकळणार्‍या तारांचा शॉर्टसर्किट होऊन तोडणीयोग्य असणारा एकर ऊस जळून खाक झाल्याने शेतकर्‍यांचे जवळपास 10-12 लाख रुपयांचे नुकसान झाले.

हे ही वाचा…

नाशिक विभागाला 1 लाख 42 हजार क्विंटल बियाणे मिळ्णार

रानमेव्यांनी फुलली बाजारपेठ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *