चांदवड : वार्ताहर
मालेगाव तालुक्यात लहान बालिकेवर झालेल्या अत्याचार आणि निर्घृण हत्येच्या निषेधार्थ चांदवड शहरात बुधवारी (दि. 19) सकाळी 11 वाजता समस्त चांदवडकरांनी तसेच सुवर्णकार समाजाने शहरातील प्रमुख मार्गावरून मूक मोर्चा काढून आपला तीव्र संताप व्यक्त केला.
या मागणीचे निवेदन तहसीलदार अनिल चव्हाण तसेच पोलिस निरीक्षक कैलास वाघ यांना सादर करण्यात आले. संतापाची लाट आणि मोर्चाचा मार्ग मालेगाव येथे घडलेल्या अत्याचार आणि हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ चांदवड शहरात संतापाची लाट उसळली होती. आरोपीला तत्काळ अटक करून फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीसाठी चांदवडकर आठवडे बाजारातील हनुमान मंदिराजवळ एकत्र जमले. त्यानंतर आठवडे बाजार, सोमवार पेठ, छत्रपती शिवाजी महाराज चौक, आंबेडकर चौक मार्गे हा मूक मोर्चा तहसील कार्यालयावर काढण्यात आला.
तहसील कार्यालयासमोर मोर्चा पोहोचताच नागरिकांनी कठोर निषेध नोंदवत, संशयित आरोपीला तत्काळ अटक करून फाशी देण्याची मागणी केली. निवेदनावर प्रदीप सोनवणे, राजेंद्र सोनवणे, पांडुरंग भडांगे, संतोष सोनवणे, महेंद्र गांधीमुथा, महेंद्र कंकरेज, प्रकाश शेळके, मनोज बांगरे, सुनील कवाडे, अमोल कोतवाल, योगेश बेलदार, राहल कोतवाल, वैभव शिंदे, शंभूराजे खैरे, वैभव बागूल यांच्यासह अनेक नागरिकांच्या स्वाक्षर्या आहेत. या घटनेच्या निषेधार्थ सुवर्णकार समाजाच्या वतीनेही स्वतंत्र मूक मोर्चा काढण्यात आला. आरोपीला कठोर शासन व्हावे, अशी मागणी त्यांनी केली. सुवर्णकार समाजाचे अध्यक्ष श्रीनिवास सोनवणे, सराफ असोसिएशनचे अध्यक्ष कमलाकर दुसाने, उपाध्यक्ष उमेश सोनवणे, सचिव अभिजित सोनवणे, खजिनदार आदेश डुंगरवाल, सदस्य कैलास सोनवणे, संतोष सोनवणे, संतोष वासुलकर, वैभव वासुळकर, सागर घोडके, रंगनाथ सोनवणे, रवींद्र खरोटे, अनिल घोडके आदी उपस्थित होते.
डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू झाले की, घरोघरी…
वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…
नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…
महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…
शेतकर्याला मारहाण करून 12 लाखांचा ऐवज लुटला ♦ किचनचा दरवाजा तोडून चौघांचा बंगल्यात प्रवेश ♦…
समोरील टायर फुटल्याने अपघात सिन्नर : प्रतिनिधी नाशिक-पुणे महामार्गावरील मोहदरी घाटात शुक्रवारी (दि. 16) सकाळी…