नाशिक

गाळमुक्त धरण जलसंवर्धनासाठी ठरणार वरदान : हरिभाऊ गिते

पुणेगाव धरणातील गाळ काढण्याच्या कामाला भेट

नाशिक : प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाच्या मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ योजना राबविली जाते. या योजनेंतर्गत संजीवनी फाउंडेशन या बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या माध्यमातून दिंडोरी तालुक्यातील पुणेगाव धरणातील गाळ काढण्याचे काम प्रगतीत आहे. या योजनेमुळे धरणाची जलसाठवण क्षमता वाढण्यास मदत होणार असून, परिसरातील शेतकर्‍यांनाही सुपीक गाळ उपलब्ध होणार असल्याने शेती उत्पादनवाढीस चालना मिळणार आहे.
धरणातील साचलेला गाळ काढल्यामुळे पावसाळ्यात अधिक पाणी साठवता येणार असून, जलसंवर्धनाच्या दृष्टीने ही योजना अत्यंत महत्त्वाची मानली जाते. धरणातून काढण्यात येणारा गाळ शेतकर्‍यांना त्यांच्या शेतात टाकण्यासाठी उपलब्ध करून दिला जाणार आहे. त्यामुळे जमिनीची सुपीकता वाढून पीक उत्पादनात सकारात्मक बदल अपेक्षित आहे. स्थानिक प्रशासन, मृद व जलसंधारण विभाग आणि लोकप्रतिनिधी यांच्या समन्वयातून हे काम सुरू करण्यात आले असून, परिसरातील नागरिकांनीही या उपक्रमाचे स्वागत केले आहे. ’गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ ही योजना जलस्रोतांचे संवर्धन आणि शाश्वत शेतीविकासासाठी महत्त्वपूर्ण पाऊल ठरत असल्याची भावना व्यक्त होत आहे. या कामामुळे धरणाचे आयुष्य वाढण्याबरोबरच भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यास मदत होईल, असा विश्वास प्रादेशिक जलसंधारण अधिकारी इंजि. हरिभाऊ गिते यांनी व्यक्त केला. शेतकर्‍यांना गाळ मोफत काढून देण्यासोबतच हेक्टरी 35 हजार रुपये अनुदान मिळणार असल्याने शेतकरी बांधवांना गाळ घेऊन जावे, असे आवाहन मृद व जलसंधारण विभागामार्फत करण्यात आले आहे. पुणेगाव धरणातील गाळ काढण्याचा प्रकल्प जलव्यवस्थापन आणि कृषी विकासाचा आदर्श निर्माण होणार आहे. या धरणातून 136038 सघमी गाळ काढण्यात येणार असून, यामधून 136 हेक्टर जमीन सुपीक होणार आहे. यावेळी प्रादेशिक जलसंधारण अधिकारी इंजि. हरिभाऊ गिते, प्रदीप लोधे, उपअभियंता पुणेगाव धरण प्रकल्प, केदू वाघ, सरपंच माळेदुमाला, रवि काकड, सागर गायकवाड, अमोल काकड, कीर्ती जायभाये यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

Silt-free dam will be a boon for water conservation: Haribhau Gite

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू झाले की, घरोघरी…

3 minutes ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

8 minutes ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

12 minutes ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

24 minutes ago

पाथरे खुर्दमध्ये सशस्त्र दरोडा

शेतकर्‍याला मारहाण करून 12 लाखांचा ऐवज लुटला ♦ किचनचा दरवाजा तोडून चौघांचा बंगल्यात प्रवेश ♦…

31 minutes ago

मोहदरी घाटात कंटेनर उलटला; नाशिक-पुणे महामार्ग ठप्प!

समोरील टायर फुटल्याने अपघात सिन्नर : प्रतिनिधी नाशिक-पुणे महामार्गावरील मोहदरी घाटात शुक्रवारी (दि. 16) सकाळी…

37 minutes ago