सिन्नरला 11 वाजेपर्यंतच सर्वाधिक 20.16% मतदान

सिन्नरला 11 वाजेपर्यंतच सर्वाधिक 20.16% मतदान

नाशिक: मतदानाला सकाळी7वाजेपासून उत्साहात सुरुवात झाली, महाविकास आघडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी येथील भाटवाडी मतदान केंद्रावर सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. स्थानिक उमेदवार असल्याने सिन्नरमध्ये मतदारांमध्ये कमालीचा उत्साह वाढला आहे, सकाळी11 वाजेपर्यंत 20.16 टक्के मतदान झाले. महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे आणि महायुतीचे हेमंत गोडसे यांच्यात लढत होत आहे, स्थानिक पातळीवर वाजे यांच्या साठी अनेक कार्यकर्ते जास्तीत जास्त मतदान होईल,यासाठी जोरदार प्रयत्न करीत आहेत, वाजे यांच्यासाठी उद्धव ठाकरे यांनी नाशिक येथील कान्हेरे मैदानावर सभा घेतली.त्यातुलनेत हेमंत गोडसे यांच्यासाठी एकही मोठी सभा झाली नाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच किल्ला लढवला, त्यामुळे दिल्ली कोण गाठणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *