नाशिक

सिन्नर पालिकेसाठी मंगळवारी मतदान ; 1 डिसेंबरपासून प्रचारबंदी

सिन्नर ः प्रतिनिधी
सिन्नर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदासह 15 प्रभागांतील 30 नगरसेवकांच्या जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीत 2 डिसेंबर रोजी सकाळी 7.30 पासून ते सायंकाळी 5.30 पर्यंत मतदान प्रक्रिया राबविण्यात येणार असून, मतदान सुरू होण्याच्या दिनांकाच्या अगोदरच्या दिवशी म्हणजेच दि. 1 डिसेंबर रोजी रात्री 10 वाजता प्रचार बंद होईल, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अभिजित नाईक व सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा मुख्याधिकारी अभिजित कदम यांनी दिली.

राज्य निवडणूक आयोगाने यासंदर्भात नगरपालिका, नगरपरिषद व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या मतदान प्रक्रिया व प्रचारबंदीसंदर्भात निवडणूक निर्णय अधिकार्‍यांना मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. त्यानुसार ‘मतदान सुरू होण्याच्या दिनांकापूर्वी म्हणजेच दि. 1 डिसेंबर रोजी रात्री 10 वाजता प्रचार बंद होईल. त्या वेळेपासून सभा, मोर्चे आयोजित करता येणार नाही तसेच प्रचारासाठी ध्वनिक्षेपकाचा वापर करता येणार नाही.
याशिवाय, निवडणूक प्रचाराशी संबंधित जाहिरात प्रसिद्धी, प्रसारणदेखील बंद होईल. दरम्यान, नगरपालिका निवडणुकीत उमेदवारी करणार्‍या उमेदवारांना प्रचारासाठी कमी दिवस मिळाले असून, दि. 26 रोजी निशाणी वाटप झाल्यानंतर अपक्ष उमेदवारांनी निशाणीसह प्रचार सुरू केला आहे. एरवी मतदानाच्या दिवसापूर्वी दोन दिवस अगोदर प्रचारबंदी केली जात होती.
तथापि, या निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने मतदानापूर्वी 12 तास अगोदर प्रचारबंदी केल्याने उमेदवारांना जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी वेळ वाढवून मिळाला आहे. निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असून, शेवटचे अडीच दिवस शिल्लक असल्याने या काळात प्रचारसभा, रॅली, चौकसभा असा प्रचाराचा धुरळा उडणार आहे.

मतदानासाठी दोन तासांची सुट्टी

सिन्नर नगरपरिषद निवडणुकीसाठी दि. 2 डिसेंबर रोजी होत असलेल्या मतदानासाठी सरकारी अधिकारी, कर्मचारी, उद्योग, ऊर्जा व कामगार विभागात येणार्‍या आस्थापना, कारखाने, दुकाने, राज्य शासन, केंद्र शासन व खासगी कंपन्यामधील आस्थापना, सर्व दुकाने व इतर आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्यगृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर, मॉल्स, रिटलर्स इत्यादींना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी दोन तासांची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

शाळा-महाविद्यालयांना दोन दिवस सुट्टी

सिन्नर नगरपरिषदेसाठी दि. 2 डिसेंबर रोजी सकाळी 7.30 पासून ते सायंकाळी 5.30 पर्यंत मतदान प्रक्रिया राबविण्यात येणार असून, निवडणुकीसाठी मतदान केंद्रांवर नियुक्त केलेल्या मतदान अधिकारी, कर्मचारी मतदान साहित्य घेऊन मतदानाच्या एक दिवस अगोदर मतदान केंद्रावर पूर्वतयारीसाठी दि. 1 डिसेंबर रोजी पोहोचतील. त्यामुळे मतदान केंद्र असलेल्या परिसरातील संबंधित शाळा, विद्यालय, महाविद्यालय यांना सोमवार (दि.1) व मंगळवारी (दि. 2) सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

 

Editorial Team

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

19 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

19 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

19 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

19 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

19 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

19 hours ago