दोन लाखांचे नुकसान; ऐन उन्हाळ्यात जनावरांच्या तोंडचा घास हिरावला
सिन्नर : प्रतिनिधी
तालुक्यातील घोटेवाडी येथील शेतकरी विलास गंगाधर घोटेकर यांचा घराशेजारील खळ्यावर असलेला कडबा व मुरघास आगीच्या भक्ष्यस्थानी पडून जळून खाक झाल्याची घटना सोमवारी (दि.14) दुपारी 1.30 ते 1.45 वाजेच्या सुमारास घडली.
घोटेवाडी येथे विलास गंगाधर घोटेकर हे कुटुंबीयांसह वास्तव्यास असून, शेतीसह दुग्धव्यवसाय करतात. दुग्ध व्यवसायासाठी पाळलेल्या जनावरांसाठी घोटेकर यांनी घराशेजारी खळ्यावर 50 ते 55 टन मुरघास बॅगा भरून ठेवलेला होता तसेचसहा ट्रॉली ज्वारीचा कडबा रचून ठेवला होता. सोमवारी घोटेकर कुटुंबीय विवाहासाठी बाहेर गेले होते तर घरात लहान मुलेच होती. दुपारी 1.30 ते 1.45 वाजेच्या सुमारास घराशेजारील खळ्यातील चार्याला आग लागल्याचे पाहताच मुलांनी आरडाओरड करून आजूबाजूच्या शेतकर्यांना बोलावले.
शेजारी शेतात वस्ती करून राहणार्या पूनम जितेंद्र घोटेकर, आप्पासाहेब घोटेकर, दादाभाऊ घोटेकर यांच्यासह परिसरातील शेतकर्यांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. विलास घोटेकर यांचा पुतण्या गणेश घोटेकर याने त्यांचे ट्रॅक्टर-टँकरच्या तीन ते चार खेपा करून आग आटोक्यात आणली. या आगीत घोटेकर यांनी जनावरांसाठी साठविलेला सहा ट्रॉली ज्वारीचा कडबा व बॅगा भरून ठेवलेला 50 ते 55 टन मुरघास भस्मसात झाल्याने घोटेकर यांना सुमारे पावणेदोन ते दोन लाखांचा आर्थिक फटका बसला आहे. ऐन उन्हाळ्यात जनावरांसाठी साठविलेला चारा आगीत खाक झाल्याने जनावरांच्या तोंडचा घास हिरावला गेला.
नाशिक: प्रतिनिधी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने तिकीट न दिल्यामुळे नाराज झालेल्या कॉंग्रेस प्रदेश प्रवक्त्या हेमलता पाटील…
मनमाडला रेल्वे कर्मचाऱ्याचा कांदे भरत असतांना शॉक लागून मृत्यू मनमाड : प्रतिनिधी मनमाडनजीक असलेल्या नागापूर…
8 लाख 75 हजार 912 शेतकर्यांची फार्मर आयडीकडे पाठ सिन्नर : भरत घोटेकर कृषी विभागाच्या…
नाशिक : प्रतिनिधी भारतीय वंशाच्या अमेरिकेत वास्तव्य असलेल्या दातृत्वाने नर्गिंस दत्त विद्यालयातील 20 मुलींना नवीन…
उपनगर वार्ताहर: उपनगर-गांधीनगर संयुक्त जयंती समितीतर्फे यावर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आगळ्यावेगळ्या प्रबोधनात्मक पद्धतीने साजरी…
सिन्नर : प्रतिनिधी सिन्नर शहराचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराजांच्या यात्रेच्या निमित्ताने शहरातीलच नव्हे तर पंचक्रोशीतील…