स्मरण – विस्मरण

सविता पोतदार

जीवन गाणे गातच राहावे
झाले गेले विसरून जावे पुढे पुढे चालावे ll
हे शांताबाई शेळके यांचे गीत आपल्याला नकळतपणे खूप काही शिकवून जाते. माणसाला स्मरणशक्ती मिळाली हे त्याच्या प्रगतीच एक मोठं गमक आहे. माणसाला आलेले अनुभव, मिळालेले ज्ञान, माहिती याची साठवण करणे आणि भविष्यात पुन्हा या गोष्टी आठवणे म्हणजेच स्मृती किंवा स्मरण.
आपला मेंदू असंख्य गोष्टी लक्षात ठेवत असतो. त्याचा आपल्याला फायदा होतो. परंतु स्मरणशक्ती नसती तर विचार करा काय झाले असते. अगदी आपण आपल्या घरात आहोत. आपल्या माणसात आहोत ही आपल्या स्मरणशक्तीची किमया! आपल्याला आपले नाव- गाव आठवते. आपलं अस्तित्व जाणवते हे सगळं स्मरणशक्तीच्याच जोरावर. ही स्मरणशक्ती नसती तर आपण आपल्या लोकांमध्ये असतो का ? नाहीतर सकाळी उठल्यावर सिनेमातल्या डायलॉग सारखे *मैं कहां हूॅ?* म्हणण्याची वेळ आली असती की हो!
अनेक गोष्टी आपल्या स्मरणात असतात. या स्मरणातील गोष्टींचा ठेवा, हा खजिना पुन्हा पुन्हा काढून इतरांसमोर आपण उलगडत असतो. अगदी शालेय जीवनात इतिहास हा विषय शिकतो तेव्हा आपण घडून गेलेल्या घटनांचेच स्मरण करत असतो ना! त्यातून त्या घटना, प्रसंग यातून काय शिकता येईल याचा विचार माणूस करतो. समाज, देश यांच्या हितासाठी नुकसानदायक प्रसंगांची पुनरावृत्ती आपण टाळतो. हे स्मरण असणं आपल्यासाठी फायद्याचं
आहे.
परंतु कधीकधी आपण अशा अनेक गोष्टी आठवत असतो की त्यांच्यापासून खरे तर त्रासच होतो. उदाहरणार्थ कधी कोणी आपल्याशी वाईट वागले असेल, आपल्याला त्रास दिला असेल किंवा काही बोलले असेल, आपल्या मनाला लागेल अशा गोष्टी आपण विसरत नाही. पुन्हा पुन्हा ते आठवत राहतो. किंबहुना या गोष्टी आपणच विस्मृतीत जाऊ देत नाही. याचे कारण या गोष्टी आपल्या मनाला टोचलेल्या असतात. तो माझ्याशी असं वागला..
ती मला तसं बोलली..
असे आपण पुन्हा पुन्हा लक्षात ठेवत असतो. आठवण काढत असतो. अशा जखमा आपणच बऱ्या होऊ देत नाहीत. त्यामुळे खरं तर आपल्याला होणारा मानसिक त्रास हा खूप मोठा असतो. कधी कधी त्याचे रूपांतर शारीरिक त्रासातही होऊ शकते.
अशा नको असलेल्या अनेक गोष्टी पुन्हा पुन्हा आपण उगाळत राहतो आणि त्याचा आपण त्रास करून घेतो.
खरंच हे कधी आपल्या सवयीचे होऊन जाते, कधी आपल्या स्वभावाचा भाग होऊन जाते हे आपल्यालाही कळत नाही.

खरं तर अशा गोष्टी आपण सोडून द्यायला, विसरायला शिकलो तर आपल्या जीवाची घालमेल होणार नाही. भावनांचा कल्लोळ माजणार नाही.

म्हणून मला वाटतं शांताबाई शेळकेंच्या या ओळीप्रमाणे विसरून जायलाही आपण शिकलं पाहिजे…

सविता पोतदार
९८५०९३६७९८.

Bhagwat Udavant

Recent Posts

त्र्यंबकेश्वर श्रावणी सोमवारी भाविकांसाठी रा. प.कडून 33 जादा बसेसची सोय

नाशिक : प्रतिनिधी श्रावण महिन्यातील पहिला, दुसरा व चौथा श्रावणी सोमवार अनुक्रमे 28 जुलै, 4…

29 minutes ago

शहरात दिवसभरात 14.2 मिमी पावसाची नोंद

जिल्ह्यातील नऊ धरणांतून विसर्ग सुरू नाशिक : प्रतिनिधी शहरासह जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या…

34 minutes ago

फायदेशीर करार

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मनमानी करत अनेक देशांवर जबर आयातशुल्क लादले. विशेषतः चीनवर जबर…

51 minutes ago

सणांचा, व्रतवैकल्यांचा महिना श्रावण

श्रावण महिना शुक्रवारपासून (दि. 25) सुरू झाला. हिंदू धर्मात श्रावणाचे महत्त्व अनन्यसाधारण असे आहे. श्रावणातील…

53 minutes ago

शाही थाटात चमका- लेहंग्यांचे ग्लॅमरस अवतार

लग्नसराई म्हटलं की, डोळ्यासमोर येते ती गाणी, डान्स, डेकोरेशन आणि अगदी हो! तुमचा लूक! त्या…

1 hour ago

फाउंडेशन आधी की कन्सीलर?

परफेक्ट मेकअप करण्यासाठी आधी फाउंडेशन लावावं की कन्सीलर? हा प्रश्न अनेक महिलांना सतावतो. चेहरा नितळ,…

2 hours ago