तस्करी करणारे तिघे महाविद्यालयीन विद्यार्थी
नाशिक : प्रतिनिधी
नाशिक पश्चिम वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी
वन्य प्राण्यांच्या अवयवांची तस्करी करणार्या तिघा महाविद्यालयीन युवकांना ताब्यात घेत अटक करत
वन्य तस्करी उधळून लावली आहे.मंगळवारी सायंकाळी वनविभागाने बनावट ग्राहक पाठवून सापळा रचून हा परकार उघडकीस आणला.
मुख् वनसंरक्षक प्रादेशिक, उपवनसंरक्षक पश्चिम भाग नाशिक, सहाय्यक वनसंरक्षक पश्चिम भाग नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक भदाणे आणि त्यांच्या यांच्या पथकाने केली.
कार्यालयाच्या विशेष वन पथकाने ही कारवाई केली आहे.
या कारवाईत बिबट वन्यप्राण्याची कातडी संख्या – १, चिंकाराचे शिंगे संख्या – २, निलगायीचे शिंगे संख्या २ तसेच ४ मोबाईल संशयितांच्या ताब्यातुन – हस्तगत केले आहेत. याप्रकरणी तिघा संशयितांवर भारतीय वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ अन्वये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
दरम्यान याबाबत माहिती अशी की, वनविभागाच्या अधिकाऱ्यांना मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारे वन अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बनावट ग्राहक बनुन तस्करी करणाऱ्या संशयितांशी संपर्क साधुन मंगळवारी संध्याकाळी ६.३० वाजता सापळा रचला. शहराचा उच्चभ्रु परिसर ओळखला जाणाऱ्या कृषी नगर जॉगिंग ट्रॅक जवळील सायकल सर्कल येथे तीन संशयित तरुणांना वन्यजीवांच्या अवयवांची विक्री करतांना रंगेहात पकडले. संशयित आरोपींमध्ये तिघेही महाविद्यालयीन विद्यार्थी असल्याचे प्रथमदर्शनी तपासात पुढे आले आहे. या संशयित आरोपीच्या साखळीतील आणखी काही साथीदार असण्याची शक्यता नाकारता येत नाही. या प्रकरणी अधिक तपास सुरू केला आहे.
शिक्षण हक्क कायद्यानुसार 31 जुलैपर्यंत विशेष मोहीम निफाड : विशेष प्रतिनिधी निफाड तालुक्यात शाळाबाह्य मुलांचा…
जिल्ह्यातील स्थिती; भावात घसारण अन् उत्पादन खर्चवाढीचा परिणाम लासलगाव : समीर पठाण मे महिन्यात झालेल्या…
र्गा भागवत यांचा जन्म इंदूर शहरात 10 फेब्रुवारी 1910 रोजी झाला. आणीबाणीच्या काळात तत्कालीन पंतप्रधान…
षाढातील कोसळणार्या पाऊसधारा, कुरकुरीत कांदे भज्यांसोबत रंगणार्या गप्पा, अशी छान मैफल कांदेनवमीला रंगत जाते. खवय्यांच्या…
नाशिक : प्रतिनिधी गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधारेमुळे धरणाच्या पातळीत वाढ झाली आहे.…
शिवसेना ठाकरे गटासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला धक्का; बागूल, राजवाडेंचा प्रवेश लांबणीवर नाशिक :…