पाण्याचे नियोजन करा : ‘जलसंपदा’च्या मनपाला सूचना
नाशिक : प्रतिनिधी
भारतीय हवामान विभागाने अल निनोच्या प्रभावाचे भाकीत वर्तविल्याने महापालिका प्रशासनाला 31 ऑगस्टपर्यंत पाण्याचे नियोजन करावे लागणार आहे. सध्याच्या घडीला शहरासाठी 115 दिवस पुरेल एवढे पाणी धरण समूहात आहे. मात्र, जून-जुलैमध्ये पावसाने हुलकावणी दिल्यास शहरावर मोठे पाणी संकट ओढावण्याची शक्यता आहे. असे झाल्यास
महापालिका प्रशासनाला पाणीकपात करण्याचा निर्णय घ्यावा लागेल. पाणीकपातीचा निर्णय घ्यायचा असेल तर त्याची अंमलबजावणी आतापासून करावी लागेल. मात्र, राजकीय विरोध पाहता असा निर्णय प्रशासन घेण्याची शक्यता कमी आहे. दरम्यान, जलसंपदा विभागाने महापालिकेला पत्र धाडत पाण्याचे नियोजन करण्याच्या सूचना केल्या आहेत.
धरण समूहात सध्या 2,433 दलघफू साठा उपलब्ध आहे. पुढील 115 दिवस म्हणजे 10 ऑगस्ट पर्यंत हा पाणीपुरवठा पुरेल. पण उर्वरित 20 दिवसांचा तुटवडा भरून काढण्यासाठी प्रशासनाला 15 टक्के पाणीकपात करण्याचा निर्णय घ्यावा लागेल. मागील हंगामात शंभर टक्के पाऊस पडल्याने यंदा नाशिक शहराची तहान भागविणार्या धरणात एप्रिल महिना उजाडला तरी पुरेसा जलसाठा आहे. पण यंदा अल निनोच्या प्रभावामुळे मान्सून सरासरीपेक्षा कमी होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. भविष्याची गरज पाहून जलसंपदा विभागाने महापालिकेला पत्र पाठवत पाणी जपून वापरण्याच्या सूचना केल्या आहे.
दरम्यान, पाणीकपात करायची की नाही याबाबतचा निर्णय महापौर, मनपा आयुक्तच घेतील. राज्यावर यंदा अल निनो संकटाचा धोका असून, ते पाहता जलसंपदा विभागाने नाशिक महापालिकेला पत्र पाठवत 31 ऑगस्टपर्यंत पाणी पुरण्यासाठी तातडीने उपाययोजना हाती घ्या, अशा सूचना दिल्या आहेत. महापालिकेकडे येत्या 10 ऑगस्ट पर्यंत पाणी पुरेल एवढा साठा असून, उर्वरित 20 दिवसांची तूट भरून काढण्याचे मात्र आव्हान असेल. वेळेत पाऊस पडला नाही, तर प्रशासनाला पाणीकपात करण्याशिवाय पर्याय राहणार नाही. महापौर व आयुक्त हेच याबाबत अंतिम निर्णय घेतील.
मनपाचे नियोजन 31 जुलैपर्यंत पाणी पुरवण्याचे आहे. परंतु जलसंपदा विभागाने 31 ऑगस्टपर्यंत पाणी पुरेल, असे नियोजन करा, अशा सूचना दिल्या आहेत. मनपाकडे वीस दिवसांचे शॉर्टेज असून, ते भरून काढण्यासाठी पाणीकपात अटळ आहे. राज्य शासन अलर्ट मोडवर असून, सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना पाणी जपून वापरा, अशा सूचना दिल्या आहेत.
जलसंपदा विभागाने नाशिक महापालिकेला याबाबत पत्र पाठविले आहे. त्यात अल निनोचा धोका पाहता गंगापूर, दारणा, मुकणे या धरणांतून होणारा पाणीपुरवठा जपून वापरा, असे स्पष्ट सांगण्यात आले आहे. एरवी जूनमध्ये पावसाचे आगमन होते व जुलैमध्ये जोरदार पावसाला सुरुवात होते. यंदा अल निनोमुळे जुलैदेखील पाऊस कमी होण्याची शक्यता आहे.
…so the decision to cut water in the city
न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…
मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…
डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…
वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…
नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…
महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…