410 कोटींचा निधी वळवला; वादाची ठिणगी पडणार?
मुंबई :
लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारची पुरती दमछाक होताना दिसून येत आहे. या योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा निधी पुन्हा एकदा वळवण्यात आला आहे. लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागातील अनुसूचित जाती घटकांसाठीचा 410.30 कोटींचा निधी वळवण्यात आला आहे. त्यामुळे यावरून पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय आणि आदिवासी विकास खात्याचा निधी या आधीही वळवण्यात आला आहे. त्यावरून सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ यांनी जाहीररित्या अर्थमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली होती. आताही त्यांच्या विभागाचा 410.30 कोटी निधी वळवण्यात आला आहे.
दोन विभागांचा 1,827 कोटींचा निधी वळवला
आतापर्यंत सामाजिक न्याय आणि अदिवासी विभागांचा 1,827 कोटी 70 लाख कोटींचा निधी महिला व बाल विकास विभागाकडे वळवण्यात आला आहे.
आतापर्यंत असा वळवला निधी
सामाजिक न्याय विभागाचा 410.30 कोटी निधी
याआधीही 410.30 कोटी निधी
आदिवासी विभाग – 335 कोटी 70 लाख
अदिवासी विभागाचा आतापर्यंत 1 हजार 7 कोटी निधी वळविला.
मृत्यू नंतरही आदिवासींच्या नशिबी पुन्हा मरण यातनाच मोखाडा: नामदेव ठोंमरे मोखाडा तालुक्याचे शेवटचे टोक असलेल्या…
सेवा शक्ती संघर्ष एस.टी. कर्मचारी संघाच्या वर्धापन दिनानिमित्त आज राज्यस्तरीय भव्य अधिवेशन नाशिक प्रतिनिधी सेवा…
नाशिक : प्रतिनिधी श्रावण महिन्यातील पहिला, दुसरा व चौथा श्रावणी सोमवार अनुक्रमे 28 जुलै, 4…
जिल्ह्यातील नऊ धरणांतून विसर्ग सुरू नाशिक : प्रतिनिधी शहरासह जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या…
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मनमानी करत अनेक देशांवर जबर आयातशुल्क लादले. विशेषतः चीनवर जबर…
श्रावण महिना शुक्रवारपासून (दि. 25) सुरू झाला. हिंदू धर्मात श्रावणाचे महत्त्व अनन्यसाधारण असे आहे. श्रावणातील…