नाशिक प्रतिनिधी
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर सक्तवसुली संचालनालयाने कारवाईचा बडगा उगारला त्यामुळे संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी आज शालिमार चौकात एकत्र येत किरीट सोमय्या यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले,. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या मालमत्तेवर सत्ता वसुली संचालनालयाने टाच आणली यामुळे शिवसैनिक संतप्त झाले असून आज शालिमार चौकात शिवसेना उपनेते सुनिल बागुल, जिल्हाप्रमुख विजय करंजकर महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर अजय बोरस्ते विलास शिंदे योगेश घोलप , सचिन मराठे, महेश बडवे ,महिला आघाडीच्या शोभा मगर मंगला भास्कर ,ज्योती देवरे ,एकता खैरे ,श्यामला दीक्षित ,मंदा दातीर बंटी तिदमे, बाळासाहेब कोकणे, सचिन बांडे , सुनील जाधव, राहुल दराडे ,वैभव ठाकरे , योगेश बेलदार शंभू बागुल, पप्पू टिळे, देवानंद बिरारी, योगेश देशमुख, नितीन चिडे, दिगंबर मोगरे , सचिन राणे ,देवा जाधव, राजाभाऊ शिरसागर, संजय चव्हाण, फैमिदा रंगरेज ,जयश्री खर्जुल यांच्यासह शिवसैनिकांनी किरीट सोमय्या यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याची अंतयात्रा काढत दहन केले.यावेळी शिवसैनिकांनी सोमय्या यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या.