धक्कादायक : महिलेकडे केली विचित्र मागणी तिच्या मुलालाही सिगारेटचे चटके

नाशिक : मला तुझ्यापासून मुलबाळ होऊ दे अशी विचित्र मागणी एका महिलेकडे केली मात्र तिने नकार दिल्याने महिला व तिच्या दोन वर्षाच्या मुलाला मारहाण करत मुलाला सिगारेटचे चटके दिल्याचा
अमानुष प्रकार देवळाली गाव परिसरात घडला आहे. याप्रकरणी पीडित विवाहितेने नाशिकरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. बुधवारी (दि.६) संशयित बाबासाहेब भगवान कपाटे (वय ३०) रा. अंधारी पळशी. ता. सिल्लोड, जि औरंगाबाद हल्ली रा. रमाबाई आंबेडकर नगर, गुलाबवाडी, मालधक्का रोड, देवळाली गाव सशयिता विरोधात बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.संशयित बाबासाहेब कपाटेने
फिर्यादी वीस वर्षीय विवाहित महिलेकडे मला तुझ्यापासून मुलबाळ होऊ देअशी विचित्र मागणी केली . संशयिताच्या या मागणीला पीडित विवाहितेने नकार दिल्याने त्या रागातून संशयित बाबासाहेब कपाटे याने पीडित महिलेसह तिच्या दोन वर्षाच्या मुलाला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. मुलगा शौर्य (वय २) याला गेल्या काही दिवसांपासून शरीराला ठीक ठिकाणी सिगारेटचे चटकेही दिले. पीडित महिलेने नाशिकरोड पोलीस ठाण्यात धाव घेतल्यावर संशयिता विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला . पुढील तपास पोलीस नाईक वाय.डी. देवरे या करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *