नाशिक

पिंपळगाव बसवंत सोसायटीमध्ये आमदार बनकर यांना धोबीपछाड

नम्रताच्या ९ तर शेतकरी विकासच्या ४जागा विजयी

पिंपळगाव बसवंत: पिंपळगाव बसवंत विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत सभासदांनी माजी सरपंच भास्कर बनकर गटाच्या नम्रता पॅनलला कौल दिला. पॅनलच्या नऊ जागा प्रचंड मताधिक्याने निवडणून आणत शेतकरी विकास पॅनलला धोबीपछाड दिली. शेतकरी विकास पॅनलचे नेतृत्व निफाडचे आमदार दिलीप बनकर यांनी केले होते. सोसायटीवरील सत्ता गेल्याने आगामी बाजार समिती निवडणूक मोठी चुरशीची होणार आहे. या निवडणुकीमुळे शिवसेना पर्यायाने माजी आमदार अनिल कदम गटाचे होसले बुलंद झाले आहेत.
पिंपळगाव विविध कार्यकारी सोसायटीच्या १३ जागांसाठी २६ उमेदवार आखाड्यात उतरले होते. आमदार दिलीप बनकर, नेतृत्वाखाली शेतकरी विकास पॅनल, तर भास्कर बनकर, यांच्या नेतृत्वाखाली नम्रता पॅनलमध्ये सरल लढत झाली. दोन्ही पॅनमध्ये स्टार प्रचारक व वजनदार उमेदवार एकमेकांसमोर उभे ठाकल्याने आगामी बाजारसमिती निवडणूक पार्श्वभूमीवर सोसायटीच्या निवडणुकीला अधिक रंग महत्व प्राप्त झाले होते. एका सभासदास जवळपास १३मते देण्याचा अधिकारी होता. ११९२ मतदारांपैकी ११६१ सभासद मतदारांनी मतदानाचा हक्क बजावित जवळपास ९५ टक्के मतदान झाले होते. शनिवारी सायंकाळी पाच वाजेपासून पोलीस बंदोबस्तात पिंपळगाव सोसायटी सभागृहात मतमोजणी झाली.
पहिल्या फेरीपासून नम्रता पॅनलने आघाडी घेत जवळपास ९ जागा निवडणून आणत भास्कर बनकर गटाने सोसायटीवरदणदणीत विजय प्राप्त केला. तर शेतकरी विकास पॅनलला अवघ्या चार
जागांवर समाधान मानावे लागले.
नम्रता पॅनल विजयी होताच सोसायटीबाहेर समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी करत आनंदोत्सव साजरा केला. याप्रसंगी शिवसेना माजी सभापती राजेश पाटील, सुजित मोरे, नितीन बनकर आदिंसह मान्यवर उपस्थित होते.

विजयी उमेदवार….
नम्रता पॅनल.….
दिलीप मोरे, रामराव डेरे, अनिल बनकर, चंद्रकांत बनकर, सोमनाथ मोरे, आशिष बागुल, विनायक खोडे, हिराबाई खोडे, शोभा बनकर,
…………शेतकरी विकास पॅनल…..
सुरेश खोडे, सतीश मोरे, दत्तात्रय देवकर, नंदू देशमाने,

Bhagwat Udavant

Recent Posts

कोकाटे यांचे मंत्रिपद वाचले पण खाते बदलले, आता हे खाते

मुंबई: विधिमंडळात ऑनलाईन रमी खेळल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेलं कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या खात्यात बदल करण्यात…

56 minutes ago

मालेगाव बॉम्बस्फोटातील पीडित परिवार जाणार सुप्रीम कोर्टात

मालेगाव बॉम्बस्फोटातील पीडित परिवार जाणार सुप्रीम कोर्टात मनमाड : आमिन शेख गेल्या सतरा वर्षांपासून न्यायच्या…

9 hours ago

मालेगाव बॉम्बस्फोट खटला: सर्व आरोपी निर्दोष

नाशिक: प्रतिनिधी संपूर्ण राज्यात गाजलेल्या मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल आज जाहीर करण्यात आला. न्या, ए…

13 hours ago

जिल्हा परिषदेच्या सीईओ आशिमा मित्तल जालन्याच्या जिल्हाधिकारी,

नाशिक:प्रतिनिधी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांची, जालना येथे जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात…

1 day ago

भिकाऱ्याकडे साडेसात कोटींची संपत्ती!

भिकाऱ्याकडे साडेसात कोटींची संपत्ती! मुंबईत दोन मोठे फ्लॅट, ठाण्यात दुकानांसह बरंच काही शहापूर  : साजिद…

1 day ago

विवाह हा संस्कार

भारतीय परंपरेतील प्रत्येकाच्या जीवनातील एक महत्त्वाचा संस्कार आहे विवाह. हे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचे वळणच…

1 day ago