ख्रिस्ती बांधवांतर्फे मनमाड शहरात नाताळ पारंपरिक पद्धतीने उत्साहात
मनमाड : प्रतिनिधी
मनमाड शहरातील ख्रिस्ती बांधवांतर्फे गुरुवारी नाताळ सण उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा झाला. नाताळनिमित्त शहरातील संत बार्णबा, संत झेवियर चर्च, बेथेल चर्च यांसह सर्वच चर्चला आकर्षक विद्युत रोषणाई केली होती. बाळ येशू यांचा जन्माचा देखावादेखील केला होता, तर सर्व चर्चमध्ये विशेष प्रार्थना करण्यात आल्या. चर्चचे प्रमुख पालक यांनी विशेष प्रार्थना करत सर्वांना आशीर्वाद दिले.
येशू ख्रिस्त एक महान व्यक्ती होते. त्यांनी समाजाला प्रेमाची आणि मानवतेची शिकवण दिली. येशू ख्रिस्तांनी जगभरातील जनतेला प्रेमाने आणि सद्भावनेने राहण्याचा संदेश दिला. येशूंना देवाची एकमेव संतान मानले जाते. त्या काळातील शासनकर्त्यांना येशू ख्रिस्तांचा हा संदेश पसंत पडला नाही, त्यामुळे त्यांनी येशू ख्रिस्तांना सुळावर लटकवले आणि मारून टाकले. त्यानंतर येशू ख्रिस्त पुन्हा जिवंत झाल्याचे ख्रिश्चन बांधव मानतात.
नाताळच्या सणाला ख्रिस्ती बांधव आपल्या घराला अतिशय सुरेख पद्धतीने सजवतात. नाताळच्या दिवशी चर्चमध्ये विशेष प्रार्थना होते. माणसे आपल्या नातेवाइकांना आणि मित्रमंडळींना भेटण्याकरिता एकमेकांकडे जातात, भेटवस्तूंचे आदानप्रदान होते.
ख्रिसमसच्या दिवशी अंगणात ख्रिसमस ट्री लावल्या जातात. त्याला देखणं रूप दिलं जातं. घरावर रोषणाई केली जाते. मनमाड शहरात देखील ख्रिस्ती बांधवांकडून नाताळ उत्साहात साजरा केला. शहरातील संत बार्णबा चर्च, संत फ्रान्सिस झेवियर्स चर्च, बेथेल चर्च आणि शहरातील इतर चर्चमध्येदेखील नाताळनिमित्ताने आकर्षक विद्युत रोषणाई करून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी लहान मुलांना भेटवस्तू देण्यात आल्या. चर्च परिसरात प्रभू येशू यांचा जन्माचा सुंदर देखावा सादर केला. शहरातील राजकीय पक्षांनी चर्चमध्ये जाऊन ख्रिस्ती बांधवांना शुभेच्छा दिल्या.
संत बार्णबा, संत झेवियर चर्चची शतकोत्तर वाटचाल!
मनमाड शहरात अनेक ब्रिटिशकालीन वास्तू आहेत. यात शहरातील संत बार्णबा चर्च व संत झेवियर चर्च ही दोन चर्च ब्रिटिशकालीन असून, या दोन्ही चर्चेला जवळपास 120 ते 125 वर्षे झालेले आहेत. मात्र, हे
चर्च अजूनदेखील सुस्थितीत आहेत. गेल्या अनेक वषार्र्ंपासून या चर्चमध्ये ख्रिस्ती बांधव मोठ्या भक्तिभावाने प्रार्थना करतात. शहरातील ही दोन चर्च शतकोत्तर वाटचाल करत आहेत. ख्रिस्ती बांधवांतर्फे चर्चची काळजी घेतली जाते.
Special prayers in all churches on Christmas
पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…
आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…
स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…
धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…
पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…