नाशिक

येवल्यात 21 जोडप्यांचा सामूहिक विवाह

सम्राट वर्मा ग्रुपतर्फे आयोजन; मणी-मंगळसूत्र, संसारोपयोगी साहित्य भेट

येवला : प्रतिनिधी
तालुक्यातील एरंडगाव येथे मोठ्या उत्साहाच्या वातावरणात आणि थाटामाटात हजारो वर्‍हाडींच्या
उपस्थितीत हा विवाह सोहळा झाला. कृष्णा एंझोटेक कंपनीच्या संचालिका मीनल वर्मा यांच्या वाढदिवसानिमित्त सम्राट वर्मा ग्रुपने आयोजित केलेला 21 जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा येवला तालुक्यातील एरंडगाव येथील वर्मा लॉन्समध्ये झाला. इथे दोन कुटुंबे नाही, तर 21 संसाराची नवी सुरुवात झाली. पूर्ण विवाह सोहळ्याची जबाबदारी उचलत संचालक विक्रम वर्मा, मीनल वर्मा, सम्राट वर्मा, हिमांशी वर्मा यांना या 21 जोडप्यांच्या कन्यादानाचे भाग्य लाभले.

सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून खासदार भास्कर भगरे, माजी आमदार मारोतराव पवार, नरेंद्र दराडे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे, सिनेस्टार तुषार कपूर, नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी, बाळासाहेब लोखंडे, कापसे उद्योगसमूहाचे बाळासाहेब कापसे, गोरख पवार, प्रमोद सस्कर आदी उपस्थित होते. जातीधर्माच्या भिंती तोडत माणुसकी, समता आणि बंधुभावाचा आदर्श घडवणारा सर्वधर्मीय विवाह सोहळा येथे सामाजिक बांधिलकी जपत पार पडला असून, सर्व गरजू घटकांचा हा सोहळा असला तरी सोहळ्यातील थाटमाट नियोजन आणि वधू-वरांचा वर्‍हाडींचा मानसन्मान
कौतुकास्पद होता.
सम्राट वर्मा ग्रुप आणि वर्मा परिवाराचे या कार्यासाठी कौतुक करावे तेवढे कमीच असल्याचे उद्गार माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी काढले. अभिनेता तुषार कपूर यांनीही या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले. समाजात सर्वधर्मसमभाव, सहिष्णुता आणि सामाजिक सलोखा अधिक बळकट करण्याचा प्रयत्न करताना या विवाहाने समाजातील रूढी, अंधश्रद्धा आणि भेदभाव कमी करण्यास उपयुक्त ठरतील, अशी भावना पाहुण्यांनी व्यक्त केली.
विशेष म्हणजे, आपल्या आईच्या वाढदिवसाच्या आनंदाच्या निमित्ताने सम्राट वर्मा यांनी हा आगळावेगळा सामाजिक उपक्रम राबवून मीनल वर्मा यांना मोठी भेट दिली. प्रारंभी वर्मा यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यानंतर पुरोहितांकडून मंगलाष्टकाच्या मंजूळस्वरात या 21 जोडप्यांच्या सात जन्माच्या गाठी बांधल्या गेल्या. विवाहाचे सर्व नियोजन करतानाच जोडप्यांना वर्मा परिवाराकडून मणी- मंगळसूत्र व संसारोपयोगी भेटवस्तू देण्यात आल्या. विवाहासाठी डीजे, बँड, पुष्पहार, पुष्पगुच्छ, विवाह मंडप, स्नेहभोजन या सर्वच सुविधा मोफत दिल्या. आखीव-रेखीव आणि नियोजन तसेच मोठ्या मनाने लावलेल्या या विवाहाचे वर्‍हाडींनी वर्मा परिवाराचे तोंड भरून
कौतुक केले.

Mass marriage of 21 couples in Yeola
 
Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

भुजबळ- जरांगेंमध्ये पुन्हा जुंपली

आरक्षण जीआरवरून एकमेकांवर टीका मुंबई : प्रतिनिधी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील आणि मंत्री…

7 minutes ago

बापमाणूस

- ज्योती काळे-जाधव जगाने आईच्या मातृत्वाइतकाच पित्याच्या बिनशर्त त्यागाला महत्त्व दिले आहे का? बाप म्हणजे…

21 hours ago

का आकर्षिते ही जिंदगी?

- अनिल उदावंंत जीवनात काहीही आणि कितीही प्रतिकूल घडलं, तरी काही अपवाद वगळता कुणाही जीवाचं…

21 hours ago

श्रावणी शुक्रवार

- योगिनी पैठणकर श्रावणी शुक्रवार हा हिंदू पंचांगातील पवित्र सण आहे. मंगळागौर, श्रावणी शुक्रवार, कहाण्या,…

21 hours ago

अभ्यासाची आवड आणि करिअरची दिशा

महाविद्यालयीन जीवन हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. शालेय शिक्षणात अभ्यासक्रम, परीक्षा आणि…

21 hours ago

जेन-झी मानसिकता

बदलत्या काळाची नवी विचारसरणी आजच्या वेगाने बदलणार्‍या जगात प्रत्येक पिढीची विचार करण्याची, निर्णय घेण्याची आणि…

21 hours ago