मनमाडहून सुटणारी स्पेशल ट्रेन आता 30 जूनपर्यंत धावणार

नाशिकरोड :  प्रतिनिधी

तोट्याचे कारण देत बंद केलेली गोदावरी एक्स्प्रेस पुन्हा सुरू करावी यासाठी गेल्या काही महिन्यांपासून प्रवाशी संघटना व प्रवासी यांच्याकडून जोरदार मागणी केली जात होती. अखेर याची दखल मध्य रेल्वेने घेत गोदावरी एक्स्प्रेस एवजी ग्रीष्म स्पेशल ही ट्रेन प्रायोगिक तत्वावर 35 दिवसांसाठी सुरु केली. 15 मे रोजी या गाडीची धावण्याची शेवटची मुदत होती. दरम्यान या नंतर काय असा प्रश्न जिल्ह्यातील चाकरमान्यांना पडला होता. मात्र रेल्वे कडून या गाडीची मुदत वाढवत ती आता 30 जूनपर्यंत धावणार आहे. या निर्णयाने रेल्वे प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *