शिवकालीन सजावटीने परिसरात उत्साही वातावरण
देवळाली कॅम्प : प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती देवळाली कॅम्प परिसरात सर्वधर्मीयांच्या उत्स्फूर्त सहभागातून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. भगवे फेटे, पारंपरिक वेशभूषा परिधान केलेल्या महिला, तसेच शिवकालीन सजावटीमुळे परिसरात दिवसभर उत्सवी वातावरण निर्माण झाले होते. भव्य देखावा आणि मान्यवरांची उपस्थिती जुने बसस्थानक येथे सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने जिल्ह्यातील सर्वांत मोठा ‘विठोबा’ देखावा सादर करण्यात आला. सकाळपासूनच शिवप्रेमींनी देखाव्यास भेट देण्यासाठी मोठी गर्दी केली होती.
यावेळी माजी खासदार हेमंत गोडसे, सार्वजनिक शिवजन्मोत्सव देवळाली अध्यक्ष प्रमोद मोजाड, कार्याध्यक्ष किरण बेरड यांच्या हस्ते शिवपुतळ्याचे पूजन व पुष्पहार अर्पण करण्यात आले. कार्यक्रमास आ. सरोज अहिरे, व्यापारी बँक संचालक अरुण जाधव, मनपा नगरसेविका संजीवनी हंडोरे, सचिन ठाकरे, नीता गोडसे, भाऊसाहेब धिवरे, दिनकर पाळदे, चंद्रकांत गोडसे, भगवान कटारिया, संजय भालेराव, पोपटराव जाधव, बाळासाहेब गोडसे, गोकुळ मोजाड, राहुल गिते, खंडेराव मेढे, सुरेश कदम, तेजस बुंदले, सुरेश निकम, आर. डी. जाधव, पंडित साळवे, किरण मोजाड, भास्कर चौधरी, संदीप चौधरी आदींसह अनेक मान्यवर व नागरिक
उपस्थित होते.
समिती अध्यक्ष प्रमोद मोजाड, उपाध्यक्ष किरण मुसळे, मोहनीश दोंदे, कार्याध्यक्ष किरण बेरड तसेच बबन कांडेकर, पोपट पाळदे, विलास संगमनेर आदींनी पाहुण्यांचे स्वागत केले. दुपारी उपस्थितांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. दिवसभर शिवप्रेमींनी देखाव्यास भेट देत जयंतीचा आनंद लुटला.
क्रांती वाचनालयात
शिवजयंतीनिमित्त व्याख्यान
लॅमरोड येथील क्रांती मित्रमंडळ संचलित सार्वजनिक वाचनालयात जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. अध्यक्ष कृष्णा थेटे व आशा वराडे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले.
यावेळी शासनाचा समाजभूषण पुरस्कारविजेते सुभाष बोराडे यांनी “रयतेचे राजे” या विषयावर मार्गदर्शन केले. रामचंद्र गोडसे, श्रीधर धुर्जड, दशरथ पाळदे, वंदना माळी आदींसह नागरिक
उपस्थित होते.
सूत्रसंचालन वाचनालयाचे अध्यक्ष सुधाकर गोडसे यांनी केले. आभार सोमनाथ खताळे यांनी मानले. स्वागताची जबाबदारी दिनेश शिंदोडे व गिरीश धुर्जड यांनी पार पाडली. सायंकाळी देवळाली कॅम्प रोड येथे फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.
Spontaneous participation of people of all religions in Shiv Jayanti at Devlali Camp
मोदींच्या 139 व्या ’मन की बात’मध्ये ईशान्येतील भरडधान्य क्रांतीचा विशेष उल्लेख नवी दिल्ली : प्रतिनिधी…
मुंबई : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)च्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन…
नाशिक : प्रतिनिधी समांतर गंगापूर रोड अर्थात स्व. मातोश्री अनुसया रामदास शिंदे मार्ग या महत्त्वाकांक्षी…
दि. 25 ते 31 ऑक्टोबर 2026 मेष : जबाबदार्या वाढतील या आठवड्यात चंद्रभ्रमणे अनुकूल आहेत.…
नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरण आणि अनंत विजय शंखनाद पथक यांच्या संयुक्त विद्यमाने कोजागरी पौर्णिमेच्या पावन…
राजकीय वर्तुळात खळबळ; भाजपकडून एसआयटी चौकशीची मागणी मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे…