राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय

आरोग्य ते शेतीपर्यंतच्या कामगिरीचे मोदींकडून कौतुक

मोदींच्या 139 व्या ’मन की बात’मध्ये ईशान्येतील भरडधान्य क्रांतीचा विशेष उल्लेख

नवी दिल्ली : प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (दि. 25) ’मन की बात’च्या 139 व्या भागात देशभरातील प्रेरणादायी कामगिरीचा उल्लेख केला. यात आरोग्य, संशोधन आणि शेती या तीन क्षेत्रांवर विशेष भर देण्यात आला. ईशान्येतील भरडधान्य क्रांतीचा त्यांनी विशेष उल्लेख केला. देशात टेलिमेडिसिनचा ऐतिहासिक टप्पा गाठला गेला असून, पन्नास कोटी सल्ले देण्यात आल्याचे त्यांनी अभिमानाने नमूद केले.
पंतप्रधान मोदींनी सांगितले की, देशाची राष्ट्रीय टेलिमेडिसिन सेवा ’ई-संजीवनी’ने सुमारे पन्नास कोटी टेलि-कन्सल्टेशनचा ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. तंत्रज्ञान कसे जीवन सुधारू शकते याचे हे उत्तम उदाहरण आहे. 1.9 लाख आयुष्मान आरोग्य मंदिरांनी आता पंचायत स्तरावर आरोग्य सेवा पोहोचवली आहे. गावकर्‍यांना आता नियमित तपासणी मिळत आहे, असे मोदी म्हणाले. मेघालयच्या पश्चिम जैंतिया हिल्स आणि नागालँडमध्ये पारंपरिक भरडधान्य शेतीला पुन्हा चालना मिळाली आहे. स्थानिक समुदायाने व्हॅल्यू डिशन आणि एकत्र येऊन केलेल्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाल्याचे मोदींनी कौतुक केले. आयआयटी मद्रासमध्ये ’परमशक्ती’ सुपरकॉम्प्युटरच्या मदतीने मानवी मेंदूचे जगातील पहिले थ्री-डी मॅपिंग करण्याचे संशोधन सुरू आहे. हे संशोधन भविष्यात मेंदूच्या आजारांवर उपचारासाठी क्रांतिकारी ठरेल, असेही पंतप्रधान म्हणाले.

बारा वर्षांच्या प्रेरणेचा प्रवास
139 व्या ’मन की बात’ कार्यक्रमात ’मन की बात’च्या 12 वर्षांच्या प्रवासाला प्रेरणेचा प्रवास आणि तीर्थयात्रेपेक्षा कमी नाही, असे संबोधले आहे. पहिला भाग 3 ऑक्टोबर 2014 रोजी विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर सुरू झाला होता आणि हा प्रवास अखंडपणे सुरू आहे, श्रोत्यांनी दाखवलेल्या प्रेमाबद्दल आभार मानत मोदी म्हणाले की, मन की बातने त्यांना देशाच्या सामान्य माणसाचे कष्ट, धैर्य, समर्पण आणि सेवाभावाचा गौरव करण्याची संधी दिली आणि समाजासाठी जगणारी माणसे ही स्वतःच तीर्थस्थळासारखी आहेत. त्यामुळे दुर्लक्षित राहणार्‍या असामान्य कार्य करणार्‍या लोकांच्या प्रेरणादायी कथा आणता आल्या.

 

Modi praises performance across sectors ranging from healthcare to agriculture

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

…आणि मी प्रेमात पडतो!

- प्रशांत पोतदार काही गोष्टींचं कारण आपल्याला कधीच कळत नाही. कुणीतरी मनापासून हसतं आणि आपल्यालाही…

5 minutes ago

समाजकल्याण की कोटकल्याण?

- गोरख काळे गरीब कुटुंबातील महिलांना स्वावलंबी बनवण्याच्या उदात्त हेतूने नाशिक महापालिकेच्या महिला व बालकल्याण…

12 minutes ago

दिवाळीचा आनंद प्रत्येक घटकापर्यंत पोहोचू द्या!

दिवाळी म्हणजे प्रकाशाचा उत्सव, आनंदाची उधळण, नात्यांमधील गोडवा आणि नव्या आशांचा जागर. घराघरांत दिवे लागतात,…

24 minutes ago

रखडलेला व्यापार करार

अमेरिकेचे विदेशमंत्री मार्को रुबियो 20 ते 22 ऑक्टोबर 2026 या कालावधीत भारत भेटीवर होते. त्यांच्या…

32 minutes ago

सप्तशृंगगडावर छबीना उत्सव साजरा

कावडधारक व तृतीयपंथीयांच्या उपस्थितीने गड दुमदुमला सप्तशृंगगड : प्रतिनिधी दसर्‍याला नवरात्रोत्सवाची सांगता झाल्यानंतर सप्तशृंगगडावर काल…

42 minutes ago

गोदाघाटावर शंखनादाचा विश्वविक्रम

नाशिक : प्रतिनिधी नाशिकच्या पवित्र गोदाघाटावर रविवारी (दि. 25) 517 वादकांनी एकाच वेळी सामूहिक शंखनाद…

50 minutes ago