नाशिक

एसटीच्या सुरक्षेला आता डिजिटल कवच

‘सीसीटीव्ही प्रकल्पा’तून प्रवाशांचे अभेद्य संरक्षण

नाशिक : प्रतिनिधी
राज्याच्या कानाकोपर्‍यांत धावणार्‍या ‘लालपरी’च्या सुरक्षेला आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे बळ मिळणार आहे. दहशतवादी आणि समाजविघातक प्रवृत्तींच्या संभाव्य धोक्यांचा विचार करून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) महत्त्वाकांक्षी असा ‘नवीन सीसीटीव्ही प्रकल्प’ हाती घेतला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून एसटीच्या बसस्थानकापासून ते विभागीय कार्यालयांपर्यंत सर्वच महत्त्वाच्या ठिकाणांवर डिजिटल नजरेचे अभेद्य जाळे उभारले जाणार आहे. ही माहिती परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.
या अत्याधुनिक प्रकल्पाची जबाबदारी ई-निविदा प्रक्रियेद्वारे निवडलेल्या टेलिकम्युनिकेशन कन्सल्टंट इंडिया लिमिटेड या संस्थेकडे सोपविण्यात आली आहे. त्यांच्या माध्यमातून प्रकल्पाची अंमलबजावणी वेगाने आणि प्रभावीपणे सुरू आहे. या प्रकल्पाचा एकूण कालावधी एक वर्ष निश्चित करण्यात आला आहे.
या प्रकल्पाचा मुख्य कणा ठरणारे मध्यवर्ती नियंत्रण कक्ष मुंबई येथे उभारण्यात आले आहे. त्याची वापरकर्ता स्वीकृती चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण झाली आहे. या नियंत्रण कक्षातून राज्यभरातील सीसीटीव्ही कॅमेर्‍यांवर केंद्रीकृत पद्धतीने लक्ष ठेवले जाणार आहे. त्यामुळे कोणतीही संशयास्पद हालचाल तत्काळ ओळखून आवश्यक ती कार्यवाही करता येणार आहे.
या प्रकल्पाच्या पायलट टप्प्यात मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर विभागातील 64 महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही प्रणाली यशस्वीरीत्या बसविण्यात आली आहे, ज्यामुळे सुरक्षेची नवी दिशा निश्चित झाली आहे. उर्वरित 27 विभाग, तसेच विविध कार्यशाळा व कार्यालयांत सीसीटीव्ही बसविण्याची पुढील कार्यवाही सध्या वेगाने सुरू आहे. या प्रकल्पामुळे एसटीच्या बसस्थानकांवर आणि कार्यालयांत सुरक्षिततेचे नवे पर्व सुरू होणार आहे. प्रवाशांचा विश्वास अधिक दृढ होणार असून, कोणत्याही अनुचित घटनांवर त्वरित नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे. ‘नवीन सीसीटीव्ही प्रकल्प’ हा केवळ कॅमेरे बसविण्याचा उपक्रम नसून, तो एसटीच्या सुरक्षेला डिजिटल कवच देणारा आणि प्रवाशांच्या विश्वासाला नवे बळ देणारा ऐतिहासिक टप्पा ठरणार आहे. यामुळे ‘लालपरी’चा प्रवास आता केवळ वेगवानच नव्हे, तर अधिक सुरक्षित, विश्वासार्ह आणि तंत्रज्ञानसज्ज होणार असल्याचे प्रतिपादन परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी यावेळी केले आहे.

प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य

प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत महाराष्ट्र शासनाने या प्रकल्पासाठी 111 कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या निधीच्या सहाय्याने एसटीची बसस्थानके, आगार, विभागीय कार्यशाळा, मध्यवर्ती कार्यशाळा, विभागीय कार्यालये, तसेच मध्यवर्ती प्रशिक्षण संस्था, भोसरी यांसारख्या संवेदनशील ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. एकूण 633 ठिकाणी 7,035 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. यामुळे एसटीच्या प्रत्येक हालचालीवर सतत डिजिटल नजर राहणार आहे, असे मंत्री सरनाईक यांनी सांगितले.

ST security now has a digital shield

 

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

2 days ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

2 days ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

2 days ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

2 days ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

2 days ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

2 days ago