महाराष्ट्र

विधवांच्या मदतीसाठी पंचायत समितीत स्वतंत्र कक्ष सुरू करा

प्रमोद झिंजाडे यांची मागणी

नाशिक : प्रतिनिधी
विधवा महिलांना सध्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असतानाच समाजातील अनिष्ट रूढी, प्रथा, परंपरा यांचा पाश या विधवा महिलांसाठी असह्य होतो आहे. अशा स्थितीत त्यांना मदत व मार्गदर्शनासोबतच शासनाचा आधार मिळण्याच्या दृष्टीने राज्यातील सर्व पंचायत समित्यांमध्ये स्वतंत्र मदत कक्ष सुरू होण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन विधवा महिला सन्मान व संरक्षण कायदा अभियानाचे प्रणेते प्रमोद झिंजाडे यांनी केले आहे.

 

ठाकरे गटाला पुन्हा खिंडार

 

विधवा महिला सन्मान व संरक्षण अभियान नाशिकच्या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. यावेळी या अभियानाचे राज्य निमंत्रक राजू शिरसाठ, ज्येेष्ठ समाजसेवक मुक्तेश्र्वर मुनशेट्टीवार उपस्थित होते. नाशिक जिल्ह्यासह राज्यभरात सुरू असलेल्या विधवा महिला सन्मान व संरक्षण अभियानाच्या माध्यमातून विधवा महिलांप्रति असलेल्या अनिष्ट रूढी, प्रथा व परंपरा बंद होऊन विधवा महिलांना सन्मानाने जगता यावे व या अनिष्ट प्रथा-परंपरांचा अवलंब करणार्‍यांना शिक्षा व्हावी तशी कायद्यात तरतूद करावी किंवा नवीन कायदा निर्माण करावा.

 

सह्याद्री रुग्णालयास मनपाची नोटीस

 

सोबतच समाजातील विधवा महिलांना भेडसावणार्‍या समस्या, कौटुंबिक अडीअडचणी, वादविवाद, शासकीय योजनांची माहिती व मार्गदर्शन, कौटुंबिक समुपदेशन, रोजगार उभारणीविषयक मार्गदर्शन इ. बाबींची सहज व सुलभ मदत व्हावी, या विधवा महिलांना आपले मन मोकळे करण्यासाठी आणि मत मांडण्यासाठी हक्काची जागा मिळावी, या उद्देशाने नाशिक शहरात विधवा महिला सन्मान व संरक्षण अभियानाचे संपर्क कार्यालय ऋणानुबंध, वसंत बहार हौसिंग सोसायटी, काठे गल्ली, द्वारका परिसर, नाशिक येथे सुरू करण्यात आले आहे. त्याचा उद्घाटन सोहळा नुकताच पार पडला.

 

सावानाचा आजपासून ग्रंथालय सप्ताह

 

या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन अभियानाचे प्रमुख प्रमोद झिंजाडे यांच्या हस्ते करण्यात आहे. याप्रसंगी प्रमोद जाधव, प्रभाकर वडजे, योगेश बर्वे, निशिकांत पगारे, बाळासाहेब बोडके, नरेंद्र कलंकार, शोभा काळे, किशोर काळे, शोभा पवार, शंकर केकरे, कुमोदिनी कुलकर्णी, यशवंत लकडे, अरुण मुनशेट्टीवार, शशांक हिरे उपस्थित होते. प्रमोद झिंजाडे यांना अमेरिकास्थित महाराष्ट्र मंडळामार्फत दिला जाणारा एक लाख रु. रोख, सन्मानचिन्ह, मानपत्र असे स्वरूप असलेला समाजकार्य पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.

Devyani Sonar

Recent Posts

जिल्हा परिषद गट-गण रचनेचे प्रारूप सादर

चांदवड, सुरगाणा, मालेगाव तालुक्यात प्रत्येकी एका गटाने वाढ, संख्या 74 वर नाशिक : प्रतिनिधी जिल्हा…

2 hours ago

मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार झाले ‘पोषणदूत’

कुपोषित बालकांच्या आरोग्य संवर्धनासाठी जिल्हा परिषदेचा उपक्रम नाशिक : प्रतिनिधी जिल्हा परिषदेच्या पोषणदूत उपक्रमांतर्गत अंतर्गत…

2 hours ago

प्रस्तावित रामवाडीतील पुलाला साइड ट्रॅक; निविदेतून वगळले

उर्वरित सव्वाशे कोटींच्या कामांना मात्र हिरवा कंदील नाशिक : प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने महापालिका प्रशासनाने…

2 hours ago

लाखलगाव परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ

रात्रीच्या वेळी घरांच्या कड्या वाजवून दहशत माडसांगवी : वार्ताहर लाखलगावसह परिसरात चोरांच्या दहशतीमुळे लाखलगावचे ग्रामस्थ…

2 hours ago

लिव्ह इन रिलेशनशिप विवाहसंस्थेला पर्याय ठरू शकत नाही

लग्न न करता एकत्र राहण्याचे (लिव्ह इन रिलेशनशिप) फॅड अलीकडे खूप वाढले आहे. विशेषतः शहरात…

2 hours ago

अखेरच्या सोमवारी शिवभक्तांची गर्दी

नाशिक ः काल शेवटच्या श्रावणी सोमवारी रिमझिम पावसातदेखील जवळपास लाखभर शिवभक्तांनी श्री कपालेश्वराच्या दर्शनासाठी गर्दी…

2 hours ago