श्री गोवर्धन पतसंस्थेचा विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी उपक्रम
सिन्नर : प्रतिनिधी
लहान वयापासूनच बचतीची सवय लागावी आणि आर्थिक साक्षरतेची जाणीव
विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी, या उद्देशाने सोनांबे येथील श्री गोवर्धन पतसंस्थेने राबविलेल्या अनोख्या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सहकार सप्ताहाचे औचित्य साधून साईनारायण गुरुकुल येथील विद्यार्थ्यांनी खाऊसाठी साठवलेले पैसे बचत खात्यात जमा करून आर्थिक शिस्तीची
सुरुवात केली.
या उपक्रमात 18 विद्यार्थ्यांनी सहभाग घेत एकूण 3,280 रुपये पतसंस्थेत जमा करत स्वतःची बचत खाती उघडली. विद्यार्थ्यांनी आपल्या बचत डब्यातील रक्कम प्रत्यक्ष बँकेत जमा केल्याने त्यांना बँकिंग व्यवहाराचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला.
यावेळी पतसंस्थेचे चेअरमन शरद रत्नाकर यांनी विद्यार्थी व शिक्षकांचे स्वागत केले. मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप घोडे यांनी विविध प्रकारच्या बचत खात्यांची माहिती देत नियमित बचतीचे महत्त्व स्पष्ट केले. शाखाप्रमुख विनोद रोकडे, सुजाता शिंदे तसेच कर्मचार्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी खाते उघडण्याची प्रक्रिया पूर्ण केली.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना खाते उघडणे, चलने भरणे, बँकेचे कामकाज आणि आर्थिक व्यवहारांची मूलभूत माहिती
मिळाली. या उपक्रमाबद्दल गुरुकुलचे संस्थापक पांडुरंग पवार, प्राचार्य नीता माळोदे तसेच पालकांनी समाधान व्यक्त केले. विद्यार्थ्यांनीही यापुढे नियमित बचत करून बँक व्यवहार करण्याचा निर्धार व्यक्त केला. उपक्रमात सहभागी विद्यार्थ्यांना पतसंस्थेतर्फे खाऊ तसेच नवीन बचतीसाठी बचत डबे भेट देण्यात आले. सिन्नरचे सहाय्यक निबंधक संजय गिते यांच्या प्रेरणेतून हा प्रात्यक्षिक आधारित उपक्रम राबविण्यात आला. यावेळी व्हा. चेअरमन भाऊसाहेब पवार, संचालक अनिल पवार, दीपक वारुंगसे, विठ्ठल पवार, शिक्षक हनुमानदास बैरागी, मोहन चव्हाणके आदी उपस्थित होते.
Starting to save from pocket money
न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…
मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…
डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…
वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…
नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…
महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…