राज्य मागासवर्ग आयोगाचा आज व उद्या नाशिक दौरा

 

बैठक व जनसुनावणीचे आयोजन

नाशिक : वार्ताहर

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग आज ( १५ जुलै ) व १६ जुलै रोजी नाशिक जिल्हा दौऱ्यावर येत आहे . शासकीय विश्रामगृह येथे आज सकाळी ११ वाजता आयोगाची महत्त्वाची बैठक होणार असून , उद्या ( १६ जुलै ) रोजी शासकीय विश्रामगृहात जनसुनावणीचे आयोजन केले असल्याची माहिती समाजकल्याण सहाय्यक आयुक्त सुंदरसिंग वसावे यांनी पत्रकान्वये दिली आहे . पत्रकात नमूद केल्यानुसार आयोजित बैठक व जनसुनवाणीसाठी राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य सेवानिवृत्त न्यायमूर्ती अॅड . चंद्रलाल मेश्राम , प्राचार्य बबनराव तयावाडे , अॅड . बालाजी किल्लारीकर , प्राध्यापक संजीव सोनवणे , डॉ . गजानन खरोटे , डॉ . नीलिमा सराप ( लखाडे ) , प्राध्यापक डॉ . गोविंद काळे , प्राध्यापक लक्ष्मण हाके , ज्योतीराम चव्हाण व सदस्य सचिव नरेंद्र आहेर आदी उपस्थित राहणार आहेत . आज ( १५ जुलै ) रोजीच्या आयोजित बैठकीत महाराष्ट्र राज्यातील विमुक्त जाती , भटक्या जमातीमधील समुदायाचे सामाजिक , आर्थिक सर्वेक्षण करणे व त्या अनुषंगाने येणाऱ्या खर्चाचे बजेट तयार करणे , खर्चाचे बजेट अंतिम करून त्यावर निर्णय घेणे असे महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात येणार आहेत . महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाकडे प्राप्त झालेल्या विविध जाती व संवर्गाच्या तक्रारीसंदर्भात जनसुनावणी १६ जुलै रोजी आयोजित केली असल्याची माहिती समाजकल्याण सहाय्यक आयुक्त सुंदरसिंग वसावे यांनी दिली आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *