नाशिक

’बिटको’मध्ये अत्याधुनिक डायलिसिस सेंटर

12 बेड, अंदाजपत्रकात आरोग्यासाठी 40 कोटींची तरतूद

नाशिक : प्रतिनिधी
महापालिकेच्या हिंदुहदयसम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालयात बारा खाटांचे अत्याधुनिक डायलिसिस सेंटर व नव्याने चार सुसज्ज शस्त्रक्रियागृह, अत्याधुनिक अशी रक्तपेढी कार्यान्वित केली जाणार आहे, असेे मनपा आयुक्त मनीषा खत्री यांनी सांगितले. सोमवारी (दि.2) आयुक्तांनी अंदाजपत्रक सादर करताना त्यांनी बिटको रुग्णालयात येत्या काही दिवसांत वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत माहिती दिली.
दरम्यान, यंदा नाशिक महापालिकेने आरोग्य विभागासाठी 40 कोटी 45 लाखांची तरतूद केली आहे. त्यानुसार वर्षभरात विविध कामे केली जाणार आहेत. नाशिक महापालिका हद्दीत पाच मोठी रुग्णालये, तीस शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. नाशिक महापालिका सार्वजनिक आरोग्य विभागातील साधुग्राम येथे होणार्‍या सिंहस्थासाठी अस्तित्वातील इमारतीचे आधुनिकीकरण व पहिल्या मजल्याचे बांधकाम करण्यात येत आहे. सिंहस्थानंतर या इमारतीच्या तळमजल्यावर अत्याधुनिक मध्यवर्ती औषध भांडार व पहिल्या मजल्यावर सुसज्ज नेत्र रुग्णालय सुरू करण्याचा मानस असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. शहरातील 340 कुष्ठरोग पीडितांना दरमहा पंधराशे रुपये उदरनिर्वाहाकरिता दिले जात आहेत.

’बिटको’त 33 हजार एमआरआय तपासण्या

बिटको रुग्णालय प्रशासनाने सवलतीच्या दरात सीटीस्कॅन व एमआरआय तपासण्या सुरू केल्या आहेत. त्यानुसार आतापर्यंत 33 हजार 461 एमआरआय व नऊ हजार 856 सीटीस्कॅन तपासण्या करण्यात आल्या आहेत. या सवलतीचा नागरिक मोठ्या संख्येने लाभ घेतल्याचे दिसते.

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

2 days ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

2 days ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

2 days ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

2 days ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

2 days ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

2 days ago